मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कर्नाटकातील बंगळुरू येथे तीन वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर एका सभेत ते म्हणाले की, भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.
११ वर्षांत आपण १० व्या स्थानावरून टॉप-५ मध्ये पोहोचलो. आता टॉप-३ कडे वाटचाल होत आहे. ‘सुधारणा, कामगिरी व परिवर्तन’ या भावनेतून ही गती आली आहे.
मोदींचे हे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘भारत एक मृत अर्थव्यवस्था आहे’ या दाव्याच्या काही दिवसांनंतर आले.
भारताच्या प्रगतीचे आकडे देत मोदी म्हणाले,२०१४ मध्ये एकूण निर्यात ४६८ अब्ज डॉलर्स होती. आता ८२४ अब्ज डॉलर्स आहे. आपण टॉप-५ मोबाइल निर्यातदार आहोत.
इलेक्ट्रॉनिक निर्यात ६ अब्ज डॉलर्सवरून ३८ अब्ज डॉलर्सवर गेली. ऑटोमोबाइल निर्यात १६ अब्ज डॉलर्सवरून दुप्पट झाली. आपण एआयमध्ये जागतिक नेता बनणार आहोत.
तीन वंदे भारत: नागपूर ते पुणे, बंगळुरू ते बेळगाव, श्री माता वैष्णोदेवी कटरा ते अमृतसर. मोदींनी बंगळुरू मेट्रोच्या यलो लाइनचे उद्घाटन केले. मेट्रोच्या १५,६१० कोटी रुपयांच्या फेज-३ प्रकल्पाची पायाभरणी केली.
भारताची प्रगती आज काही लोक पचवू शकत नाहीत
स्वतःला जगाचे मालक समजणाऱ्या काही लोकांना भारताची प्रगती पचवता येत नाही. त्यांना आमची उत्पादने महागडी व्हावी असे वाटते.. पण भारताला मोठी शक्ती होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. – राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री (रायसेनमधील कार्यक्रमातून)
काही देशांकडून दादागिरी
आज जे लोक छळ करत आहेत ते आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत. आपल्याला तंत्रज्ञान व संसाधने मिळाली तरी आपण कोणाला छळणार नाही.- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज