टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंणजीत माने यांच्या विरोधात खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.
याप्रसंगी शेतकरी संघटनेचे सिध्देश्वर हेंबाडे, दामाजी साखर कारखान्याचे माजी संचालक संभाजी लवटे, जनहित शेतकरी संघटनेचे नाना बिचुकले, सर्जेराव गाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धन्यकुमार पाटील, मनोज चव्हाण, उद्योजक दिलीप उगाडे, अँड.बिरुदेव घोगरे, उद्योजक विजय भोसले, जेष्ठ नागरिक मधुकर बेदरे, धनंजय पवार, रवी पवार आदीजन उपस्थित होते.
मंगळवेढा तालुक्यात दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक रणजीत माने हे रुजू झाले आहेत. त्यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे रुजू झाल्यापासून मंगळवेढा तालुक्यामध्ये दिवसाढवळ्या अनेक घरफोड्या झाल्या आहेत, त्यापैकी बऱ्याचशा घरफोड्यांचा अद्याप तपास लागलेला नाही.
निंबोणी येथील कामू पाटील यांचा खून होऊन एक वर्ष उलटले तरीही अर्थीक तडजोड करून खुनाचा गुन्हा दाखल न करता, आरोपीना अटक न करता अध्याप मोकाट सोडून दिले आहे.
परप्रांतीय चार वर्षीय बालक रणवीर कुमार साहू या बालकाचे दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी अपहरण झालेले आहे त्याचाही अदयाप तपास लागलेला नाही.
तसेच मंगळवेढा तालुक्यामध्ये अवैद्य मटका, अवैध गुटखा, अवैध दारू, अवैध वाळू वाहतूक, अवैधरित्या होणारी सांगोला येथून जनावराच्या बाजारातून कत्तल खाण्याला जाणान्या वाहनांची वाहतूक, शेजारीच असलेल्या कर्नाटक राज्यातून होणारी गुटख्याच्या वाहनांची वाहतूक.
संतांची भूमी अशी ओळख असलेला मंगळवेढा तालुका असून या ठिकाणी पदभार घेतल्यापासून पी. आय. माने यांनी तीन ते चार ठिकाणी वेश्या व्यवसायाचे अड्डे सुरू करण्यास मंथली हप्ते घेऊन परवानगी दिलेली आहे.
सदरच्या वेश्याव्यवसायिकांकडून हप्ते घेत असल्यामुळे पी. आय. माने व त्यांचे वसूलदार हे वेश्या व्यवसायिकांवरती कारवाई करत नसल्याने, काही सुज नागरिकांनी सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सरदेशपांडे साहेब यांच्याकडे गोपनीय तक्रार केल्यानंतर त्यांनी 29 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय महामार्ग लगत असणाऱ्या हॉटेल ज्ञानेश्वरी लॉज वरती चालणाऱ्या वेश्याव्यवसायावरती कारवाई केली आहे.
तरीही पोलीस निरीक्षक रणजीत माने हे, सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मूळ रहिवासी असल्याने त्यांचे जिल्हयातील राजकीय पुढाऱ्यांशी खूप सलोख्याचे संबंध आहेत त्यातूनच ते काही राजकीय पुढाऱ्यांनकडून वरिष्ठांवरती दबाव आणून स्वतःची बदली होऊ देत नाहीत, व नियमबाह्य मुदतवाढ मिळवून घेत आहेत.
तरी मंगळवेढा तालुक्यामध्ये सुरु असलेले खुलेआमपणे अवैध व्यवसाय व अनेक ठिकाणी सुरु असलेले वेश्या व्यवसाय तात्काळ बंद करून, मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक यांची नेमणूक करावी व वादग्रस्त असलेले व वरील सर्व प्रकरणांचा तपास लावण्यात निष्क्रिय ठरलेल्या हप्तेखोर व अष्ट पोलीस निरीक्षक माने यांची खातेनिहाय चौकशी सुरु करून त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे,
अन्यथा गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी पासून कारवाई होईपर्यंत मंगळवेढा पोलीस स्टेशन समोर हजारोच्या संख्येने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल याची पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
चौकशी करून कारवाई
उपोषणकर्त्याचे जे म्हणणे आहे त्याच्यावर चौकशी करून कारवाई करण्यात येईल. – शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण.
प्रकरणाची योग्य ती चौकशी करू
सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात येईल- डॉ.अर्जुन भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज