टीम मंगळवेढा टाईम्स । केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने सोलापूर जिल्ह्याला निर्यात केंद्राची मान्यता दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील (To many industries including textile, garment, agriculture) वस्त्रोद्योग , गारमेंट , शेती यासह अनेक उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे. (Inclusion of Solapur district in the export hub)
परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाचे प्रमुख अधिकारी रणजित कुमार रॉय यांनी यासंदर्भातील पत्र प्रसिद्धीस दिले आहे. देशभरातील सर्व जिल्हे हे निर्यात केंद्रे करण्याचे सरकारचे धोरण आहे.
याअंतर्गत पथदर्शी प्रकल्पासाठी देशातील पाच राज्यांतील प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण पाच जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.
यामध्ये भुवनेश्वर ( ओडिशा ) , इम्फाळ ( मणिपूर ) , जम्मू ( जम्मू व जम्मू – काश्मीर ) , रामनगर ( कर्नाटक ) आणि सोलापूरला ( महाराष्ट्र ) मान्यता दिली आहे . याकरिता सोलापरचे खा.डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी ( Dr. Jayasiddheshwar Mahaswami) यांनी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पाठपुरावा केला होता.
राष्ट्रीय महामार्ग , फलोत्पादनाबाबत सोलापूर जिल्हा पोषक असल्याने सोलापूरला निर्यात केंद्र म्हणून मान्यता देण्याची विनंती त्यांनी केली होती. याशिवाय चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी निर्यात केंद्राची मागणी लावून धरली होती.
सोलापूरात टेक्सटाईल , गारमेंट , साखर उद्योग तसेच शेतीमध्ये फलोत्पादन मोठ्या प्रमाणात आहे . त्यामुळे या निर्यात केंद्राचा फायदा यासह अनेक उद्योगधंद्याना होणार आहे . सोलापूरातील सर्व निर्यातदारांना या केंद्राचा लाभ आगामी काळात मोठ्या प्रमाणात होणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज