mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आनंदाची बातमी! उजनी धरण पाच दिवसांत निम्मं भरलं, लवकरच शंभरी गाठण्याची आशा; आज धरण ‘इतके’ टक्के पार करणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 30, 2024
in सोलापूर
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

टीम मंगळवेढा टाईम्स ।

भीमा खोऱ्यात पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरुवात झाल्याने खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू होता.

तर बंडगार्डन येथून २५ हजार २१८ क्युसेक विसर्ग चालू होता. सध्या दौंड येथे २१ हजार ३२२ क्युसेक विसर्ग सुरू असून मंगळवार सकाळपर्यंत दौंड येथील विसर्गात वाढ होणार आहे.

सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील ३० लाख लोकसंख्या, २ लाख पशुधन, किमान ५० साखर कारखाने, २५ औद्योगिक वसाहती, अनेक जलसिंचन योजना, पिण्याच्या पाणीपुरवठा योजना यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी मंगळवार दि. ३० जुलै सायंकाळपर्यंत ५० टक्के होणार आहे.

सोमवार दि. २९ रोजी सायंकाळी उजनी धरणाची पाणी पातळी ४२.०९ टक्के झाली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी उजनी ६६ दिवस अगोदर ५० टक्के भरणार आहे.

यावर्षी ७ जूनपासून उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली होती. तर भीमा खोऱ्यात सातत्याने पाऊस सुरू असल्याने ९ जूनपासून दौंड येथील विसर्ग कायम सुरू आहे. यामुळेच उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढू शकली.

गेल्या आठवड्यात भीमा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे सोमवारपासून उजनी धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. पाच दिवसांत ५० टक्के भरत आले आहे.

पानशेत धरणातून १५ हजार १३६ क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने खडकवासला धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. यामुळे मुळा-मुठा नदीद्वारे बंडगार्डन येथून मोठ्या प्रमाणात विसर्ग भीमा नदीत मिसळत आहे. सध्या चासकमान येथून ५ हजार १४५ क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

आठ दिवसांत ६३ टक्के पाणी

सोमवार दि. २२ जुलै रोजी सायंकाळी उजनी धरणाची पाणी पातळी वजा २१.३१ टक्के होती. गेल्या आठ दिवसांत ६३.०४ टक्के पाणी पातळी वाढली आहे. तर ५४.६९ टीएमसी पाणीसाठा ७ जूनपासून उजनी धरणात जमा झाला आहे.

तर गेल्या आठ दिवसांत ३४.०९ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. १५ ऑक्टोबर २३ रोजी ६०.६६ टक्के भरले होते. २१ जानेवारी मृत साठ्यात  गेले होते.

तर ७ जून २४ पर्यंत यावर्षी वजा ५९.९९ टक्के इतके सर्वाधिक खाली गेले होते. शुक्रवार दि. २६ जुलै २४ रोजी शून्य टक्के पाणी पातळी झाली होती प्लसकडे वाटचाल केली होती.(स्रोत:लोकमत)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

स्थानिक पोलिसांनाही थांगपत्ता लागणार नाही; एसपींचे ‘गुप्त पथक’ करणार कारवाई; सोलापूर ग्रामीणमध्ये ‘खळबळ’; एसपींचे विशेष पथक ॲक्टिव्ह; अवैध धंद्यांचे ‘काउंटडाउन’ सुरू

March 30, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये! गॅस सिलिंडर घरपोचच द्या; अन्यथा गुन्हे दाखल; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; ‘इतक्या’ दिवसांत घरपोचचा दावा

March 26, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मोठी बातमी! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे झेडपी अन् पंचायत समित्यांना मोठे गिफ्ट; तब्बल इतक्या कोटींचा दिला निधी

March 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांची फवारणी आता हायटेक! ड्रोन खरेदीसाठी मिळणार ‘इतके’ लाखांपर्यंत अनुदान; वेळेची आणि श्रमाची होणार बचत; असा घ्या लाभ

March 23, 2026
अभिमानास्पद लढा! मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला महाराष्ट्र केसरीचा उपविजेता; मिळाली ‘ही’ बक्षिसे

महाराष्ट्र केसरी: महेंद्रची झुंज ठरली थरारक; मंगळवेढ्याचा ‘मान’ थोडक्यात हुकला; मैदानात काय घडलं?

March 23, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवसायाचे आमिष दाखवून शेतकऱ्याला १४ लाखांचा गंडा; पुण्यातील तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 24, 2026
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी! दरात मोठी घसरण; सरकार देत आहे 5117 रुपयात सोनेखरेदीची संधी

विश्वासघात! ३० वर्षे सेवा बजावणाऱ्या सचिवाने लॉकरमधून लंपास केले ८७ लाखांचे सोने; ‘या’ पतसंस्थेत मोठा घोटाळा; खातेदारांचा जीव टांगणीला

March 22, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

एका रागाचा असाही अंत! मोबाईलवरून रागावताच नववीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; सोलापुरात पालकांवर दुःखाचा डोंगर

March 21, 2026
Next Post
शेतकऱ्यांनो! ई-पीक पाहणी कालावधीस ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांनो! 'या' उत्पादक पिकांना हेक्टरी पाच हजारांची मदत जाहीर; राज्य सरकार देणार एकूण ४,१९४ कोटींची मदत; नोंदणीकृत शेतकरीच पात्र

ताज्या बातम्या

मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

March 30, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

March 30, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

स्थानिक पोलिसांनाही थांगपत्ता लागणार नाही; एसपींचे ‘गुप्त पथक’ करणार कारवाई; सोलापूर ग्रामीणमध्ये ‘खळबळ’; एसपींचे विशेष पथक ॲक्टिव्ह; अवैध धंद्यांचे ‘काउंटडाउन’ सुरू

March 30, 2026
पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

March 29, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा