टीम मंगळवेढा टाईम्स ।
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निरीक्षकपदी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे अध्यक्ष अजित जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निरीक्षक नेमले आहेत.
यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू व पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे अध्यक्ष अजित जगताप यांची सांगोला विधानसभा मतदारसंघ निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.
निवडीनंतर जगताप म्हणाले, सांगोला मतदारसंघात अधिक लक्ष देण्याची गरज ओळखून पक्षाने माझी निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. ही जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडून
सांगोला विधानसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवारास अधिकचे मताधिक्य मिळवून देण्यासाठी दीपक साळुंखे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असल्याचे अजित जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्यकारी जिल्हा अध्यक्ष रामेश्वर मासाळ यांची देखील उत्तर सोलापूर मतदारसंघाच्या निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
समाजातील सर्व घटकांचा समावेश करुन तालुका व शहर कार्यकारणी करण्यात यावी. तालुक्यातील बुधवाईज कमीट्या सक्षम करण्यात याव्यात, प्रत्येक महिन्याला स्थानिक तालुका कार्यकारणीची बैठक घेण्यता यावी.
प्रदेश कार्यालयाकडुन येणारे पक्षाचे सर्व कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावेत. पक्ष संघटन मजबुत करण्यात यावे.
याप्रमाणे पक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली असून तसेच निरीक्षक यांनी केलेल्या कामाचा अहवाल सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी च्या सोलापूर येथील कार्यालय यांचेकडे प्रत्येक महिन्याला तातडीने देण्यात यावा असे देखील सांगितले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज