mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढयात अन्य जिल्हयातून ६ हजार ९२४ नागरिक दाखल;कोरोनाबाधित एकही रुग्ण नाही

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढयात अन्य जिल्हयातून ६ हजार ९२४ नागरिक दाखल;कोरोनाबाधित एकही रुग्ण नाही



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यात परदेशातून ८ , इतर राज्यातून एक असे ९ लोक आले तर इतर अन्य जिल्हयातून ग्रामीण भागात आलेल्या ६ हजार ९२४ नागरिकांची नोंद आरोग्य विभागाकडे करण्यात आली असून यामधील एकही कोरोनाबाधित नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

देशासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजाराने धुमाकुळ घातल्याने प्रत्येकजण आपला जीव वाचविण्यासाठी नोकरीच्या ठिकाणाहून मूळ आपल्या गावी कुटुंबाकडे परतत आहेत. आत्तापर्यंत परदेशातून ८ जण आले आहेत. त्यापैकी एकजण राजस्थानमधून आल्याने त्याला ताप , सर्दी असल्याने केगाव येथील होम क्वारंटाईन्ड ठेवण्यात आले आहे.

तर दुबई , मलेशिया , सौदे अरेबिया , आबूधाबी , कतार , उजबेकिस्तान आदी देशामधून आलेल्या ८ पैकी ६ जणांना होम क्वारंटाईन्ड तर अन्य दोघांना मंगळवेढा येथील मुलींच्या वसतीगृहात असलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे पत्ते व मोबाईल नंबर प्रशासनाने नोंदवून घेतल्याने अधूनमधून त्यांच्याकडे आरोग्याबाबत चौकशी केली जात आहे.

जीवाच्या भितीपोटी पुणे, सांगली,सातारा , कर्नाटक राज्य , उस्मानाबाद , कोल्हापूर या जिल्हयातून ६ हजार ९२४ नागरिक आपल्या मूळ गावी परतले आहेत. प्राथमिक आरोग्यकेंद्र निहाय आकडेवाडी पुढीलप्रमाणे – आंधळगांव प्राथमिक आरोग्य केंद्र १५३३ नागरिक , सलगर बु . प्राथमिक आरोग्य केंद्र १०२१ , भोसे प्राथमिक आरोग्य केंद्र १६३२ , बोराळे प्राथमिक आरोग्य केंद्र १२५४ , मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र १४८४ असे एकूण ६९२४ नागरिक विविध ठिकाणाहून बाहेर गावाहून आले आहेत.

या सर्वांच्या नोंदी प्रत्येक गावच्या ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडे करण्यात आल्या आहेत . या सर्वांना तपासून सर्दी ,ताप , खोकला नसल्याची खात्री करून त्यांना घरी पाठविण्यात आले.

मंगळवेढा शहरात ८ लोकांची टिम मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केली असून या टिमने शहरात ४०७ नागरिक बाहेर गावाहन मंगळवेढा शहरात दाखल झाल्याची नोंद नगरपालिकेकडे घेण्यात आली आहे. मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात शहरातील १५२ नागरिकांना तर ग्रामीण भागातील २२० असे एकूण ३७२ लोकांना तपासण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. प्रमोद शिंदे यांनी दिली.

दरम्यान मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात दि . २७ मार्च अखेर कोरोनाबाधित एकही रुग्ण सापडला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले . यामुळे शासकीय यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला आहे . पोलिस प्रशासन , आरोग्य खाते , आशा वर्कर ,अंगणवाडीसेविका , नगरपालिका कर्मचारी आदी खबरदारी म्हणून सातत्याने अलर्ट रहात असल्याचे चित्र आहे.

शुक्रवारी दुपारी २ वा . कर्नाटक राज्यातून १३ ट्रक व कंटेनर भरून नागरिक मंगळवेढा तालुक्यात प्रवेश करीत होते. सीमाबंदी असल्याने पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी या सर्वांना मरवडे येथील चेक पोस्टवर रोखले. हे सर्व लोक राजस्थान व हरियाना राज्यात जात असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedha

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
लॉकडाऊनचा कालावधी वाढणार ? सरकारकडून थेट तीन महिने करण्याचा विचार

लॉकडाऊनचा कालावधी वाढणार ? सरकारकडून थेट तीन महिने करण्याचा विचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा