टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा व सांगोला येथील गणेश उत्सव व ईद-ए- मिलाद या दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली
जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे आज सायंकाळी ४ वाजता शांतता कमिटीची मिटींग आयोजित केली असून गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व मुस्लिम बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
मंगळवेढा व सांगोला या दोन तालुक्यात भविष्यात येणाऱ्या गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या दोन सणानिमित्त दोन्ही तालुक्यातील मंडळाचे कार्यकर्ते व मुस्लिम बांधव आदींचे सण शांततेत पार पडावे
यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे मार्गदर्शन करणार असून दोन्ही तालुक्यातील मंडळाचे कार्यकर्ते, पोलीस पाटील, मुस्लिम बांधव, डॉल्बीवाले, स्पिकरवाले, मंडपवाले व मंडळाचे पदाधिकारी,
महिला दक्षता कमिटी, विविध पक्षातील पदाधिकारी आदींनी या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला प्रांत अधिकारी बी. आर. माळी, डी.वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड, सांगोला पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, मंगळवेढा पोलीस निरीक्षक रणजीत माने व अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान या कार्यक्रमात एक गाव, एक गणपती हा महत्वकांक्षी उपक्रम जास्तीत जास्त मंडळाने राबवून समाजापुढे एक आदर्श निर्माण करावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज