टीम मंगळवेढा टाईम्स।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात १४ नोव्हेंबरपासून गृह मतदानाला (होम वोटिंग) सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ८५ वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या, दिव्यांग मतदाराला त्यांची इच्छा असल्यास गृह मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
ही प्रक्रिया दि. १४ ते १६ नोव्हेंबर सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत अशी तीन दिवस चालणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील अशा मतदारांना टपाली मतदानाचे नमुना १२ ड अर्ज उपलब्ध करून दिले होते. त्यापैकी प्राप्त अर्जावर निर्णय घेतला असून,
पंढरपुर विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या तसेच दिव्यांग मतदारांची संख्या ४७२ इतकी आहे. या मतदानासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांची २० पथके नेमली आहेत.
प्रत्यक्ष मतदानाच्या ठिकाणी उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतात. या सर्व मतदान प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. गृह मतदानास संबधित मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन पंढरपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
चक्रिका अॅपचा वापर बंधनकारक..
निवडणूक प्रक्रियेत सुलभता आणि कार्यक्षमता वाढण्यासाठी चक्रीका ‘अॅप’चा वापर बंधनकारक असून, निवडणूक नियुक्त्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरमधून चक्रिका अॅप डाऊन करावे.
चक्रिका ‘अॅप द्वारे मतदान कर्मचाऱ्यांना मतदारांची तपशीलवार माहिती, मतदान केंद्रांचे निर्देश आणि प्रक्रियेतील आवश्यक सूचना सहज मिळतात. मतदानाच्या वेळी उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्यांवर त्वरित तोडगा काढण्यासाठी तसेच मतदानाचे अहवाल पाठविण्यासाठी हे अॅप उपयुक्त आहे.
निवडणूक नियुक्त्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्काळ या अॅपचा वापर करावा, असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज