टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील भारतीय स्टेट बँकेच्या दोन ग्राहकांना अज्ञात नंबरवरून ओटीपी मागवून फसविण्याचा प्रकार केला गेला.
मात्र जागरूक ग्राहकाने प्रसंगावधानाने बँकेचे शाखाधिकारी सुनिल बिडकर यांच्याशी संपर्क साधल्याने खात्यावरून जाणारे पैसे वाचल्याने त्या दोघांचा जीव भांड्यात पडला.
दरम्यान, बँक ग्राहकांनी अज्ञात नंबरवरून आलेल्या नंबरला प्रतिसाद देवू नये असे आवाहन बँकेने केले आहे.
मंगळवेढा येथील भारतीय स्टेट बँकेच्या दोन ग्राहकांना अज्ञात नंबरवरून कॉल आले होते. त्यांनी एक लिंक पाठवून मोबाईल हॅक करण्याचा प्रकार केला.
जागरूक ग्राहकाने तात्काळ बँक मॅनेजर सुनिल बिडकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला व आपल्या बँकेकडून लिंक पाठविली गेली आहे काय ? याबाबत खात्री करून घेतली.
बँक अशा प्रकारची कुठलीही ग्राहकांना लिंक पाठवत नाही. याचा खुलासा बँकेने केल्याने खात्यावरील जाणारी रक्कम वाचली आहे. सध्या सोशल मिडीयाचा जमाना असल्याने सोशल मिडीयावर अनेक डमी लिंक फिरत असतात.
त्याला कुणीही ओपन करून प्रतिसाद देवू नये, प्रतिसाद दिल्यास डाटा व पैसे जाण्याची शक्यता असते. परिणामी खातेदारांचे नुकसान होते.
तसेच ती लिंक स्वतः ओपन करू नये व फॉरवर्डही करू नये. अशा बनावट लिंक फॉरवर्ड करणे हा गुन्हा असल्याने संबंधीतावर गुन्हाही दाखल होवू शकतो असा बँकेकडून खुलासा करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज