mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आत्मपरीक्षण! काँग्रेसच्या पराभवासाठी ‘ही’ गोष्ट कारणीभूत? 2024 च्या निवडणुकीआधी वाजली धोक्याची घंटा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 4, 2023
in राजकारण, राष्ट्रीय
कर्नाटकात भाजप कोमात, काँग्रेस जोमात; काँग्रेसची जोरदार मुसंडी; बहुमताचा आकडा आता फक्त काही जागांवर दूर

टीम मंगळवेढा टाईम्स।

चार राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये काँग्रेसला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे.

तर, तेलंगणामध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळाले. मात्र, काही विजयाची अपेक्षा असताना आणि चांगल्या योजना असतानाही राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी असताना काँग्रेसचा हा पराभव म्हणजे पक्षासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमधील जोरदार विजयानंतर काँग्रेस हा ‘इंडिया’ या विरोधी पक्षांच्या आघाडीचा मजबूत आधारस्तंभ बनण्याच्या मार्गावर होती. आता हा पराभव त्यात मोठा अडथळा ठरणार आहे.

त्याचवेळी राहुल गांधींनाही या निकालांमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता होती. गेल्या वर्षी आपल्या भारत जोडो यात्रेद्वारे राहुल गांधी यांनी देशात काँग्रेससाठी फक्त सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही

तर स्वत:ला एक गंभीर नेता म्हणून लोकांसमोर आणले. त्याचमुळे मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष असतानाही राहुल गांधी लोकांमध्ये काँग्रेसचा चेहरा बनले होते.

काँग्रेसचा पराभव काँग्रेसने केला?

हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये काँग्रेसच्या या लाजिरवाण्या पराभवासाठी इतर घटकांपेक्षा काँग्रेसलाच जबाबदार धरले जात आहे. या पराभवानंतर कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशच्या विजयानंतर काँग्रेसमध्ये आलेला अतिआत्मविश्वास आणि गर्व हे नडलं असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी राष्ट्रीय नेतृत्व आणि पक्षाच्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष केले आणि स्वतःच्या जिद्द आणि इच्छाशक्तीच्या आधारे निवडणुकीचे निर्णय घेतले. त्याच्या परिणामी पक्षाला पराभव स्वीकारावा लागला.

अशोक गेहलोत, कमलनाथ आणि भूपेश बघेल या नेत्यांनी तिकीट वाटप करताना पक्षाच्या सर्वे रिपोर्टला बगल देत आपापल्या पद्धतीने तिकीट वाटप केल्याची चर्चा आहे.

तर, काही ठिकाणी तिकीट वाटपासाठी पैसे घेण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत सरकारने चांगले काम केले. विविध योजनांचा फायदा लोकापर्यंत पोहचला. मात्र, स्थानिक पातळीवर विद्यमान आमदारांविरोधात मोठ्या नाराजीचे वातावरण होते. तर गटबाजीचा फटका काँग्रेसला बसला. तर, मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्याकडे पक्षाची एकहाती सूत्रे होती.

कमलनाथ यांच्याशिवाय कोणताच निर्णय होत नसल्याची तक्रार समोर येत होती. काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी कुटुंबीय, निकटवर्तीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला. त्याच्या परिणामी काँग्रेसचा केडर फारसा सक्रिय दिसला नाही.

वादग्रस्त मुद्यांवरील मौनाचा फटका

द्रमुक पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातनची डेंग्यू आणि मलेरियाशी तुलना करून वादाला तोंड फोडले होते. ज्यात काँग्रेसचे मौन आणि काही नेत्यांची बेताल वक्तव्ये याचा फायदा भाजपने मोठ्या प्रमाणावर घेतला.

या मुद्याला निवडणुकीच्या आधी तापवण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झाले आणि काँग्रेसच्या बाजूने झुकलेला मतदार पुन्हा एकदा भाजपच्या बाजूने गेला असल्याचे म्हटले जात आहे.

छत्तीसगडमध्ये ही मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या कार्यपद्धतीवर अनेकांना आक्षेप घेतला होता. पक्षांतर्गत गटबाजीदेखील उफाळून येत होती. सरकारवर असलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप, वरिष्ठ नेत्यांमधील गटबाजी आणि बघेल यांच्या मनमानी कारभाराला जबाबदार धरले जात आहे.

काँग्रेस हिंदी पट्ट्यातील जात जनगणना आणि ओबीसींचा मुद्दा उचलून धरत होती, त्याचा फायदा होईल असे म्हटले जात होते. मात्र, काँग्रेस लोकांसाठी प्रभावीपणे काम करू शकेल, असा विश्वास मतदारांना वाटला नसावा हेदेखील एक कारण असल्याचे म्हटले जात आहे.

राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची वाट बिकट?

आज लागलेल्या निकालांचा परिणाम विरोधकांच्या इंडिया आघाडीवर होणार हे स्पष्ट आहे. विरोधकांची आघाडी तयार करण्यात काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, आजच्या निकालाने त्यांना झटका बसला आहे. इंडिया आघाडीच्या आगामी बैठकीत काँग्रेसची वाटाघाटी करण्याची ताकद कमी होणार असल्याचे म्हटले जाऊ लागले आहे.

इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्ष आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वीच जेडीयू आणि नितीश कुमार यांनी पाच राज्यांच्या निवडणुकीत भारत आघाडीबाबत काँग्रेसवर उदासीनता असल्याचा आरोप केला होता. तर मध्य प्रदेशमध्ये जागा वाटपावरून काँग्रेस आणि सपा नेते अखिलेश यादव आमनेसामने आले आहेत.

आगामी काळात सपा, जेडीयू, टीएमसी, आप यासारखे पक्ष आघाडीत काँग्रेसकडे अधिक जागांची मागणी करत आपल्या राज्यांमध्ये अधिक जागांची मागणी करू शकतात.(स्रोत:abp माझा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: राहुल गांधी

संबंधित बातम्या

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रकृतीबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती; म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार; नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून यांची लागणार वर्णी?

July 12, 2025
बापाचे पाऊल वाकडे पडले,मुलाने त्याला यमसदनी धाडले; बेकरी चालकाच्या हत्येचे गूढ उकलले

धक्कादायक! मुलीच्या कमाईवर जगत असल्याच्या टोमण्यांमुळे वडिलांकडून मुलीची हत्या

July 12, 2025
मंगळवेढा ‘या’ ग्रामपंचायतीची स्वातंत्र्य दिनाची अनोखी भेट; आजी-माजी सैनिकांना कर सवलत देण्याचा केला ठराव

Bharat Bandh : २५ कोटी कामगार संपावर, आज भारत बंद; कोण कोणत्या सेवांवर परिणाम होणार?

July 9, 2025
चिंता वाढली : मंगळवेढ्यात कोरोनाचा दहावा बळी; 35 वर्षीय महिलेचा मृत्यू

हृदयविकारामुळे मृत्यूचा ‘या’ लसीशी कोणताही संबंध नाही; अचानक ‘हार्ट ॲटॅक’ मागे अनेक कारणे; केंद्र सरकार दिले स्पष्टीकरण

July 3, 2025
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या रतनचंद शहा सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम सुरू; १५ जागांसाठी ‘इतके’ अर्ज दाखल

July 2, 2025
खिशावर डल्ला : सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ, हे आहेत आजचे दर

नागरिकांनो! आजपासून ‘या’ वाहनांना पेट्रोल- डिझेल मिळणार नाही, का आणि कुठे घेण्यात आला निर्णय? पेट्रोल पंपावर असणार कडक नजर

July 1, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अर्थमंत्री असूनही का व्हायचं होतं कारखान्याचं चेअरमन? काय होती अजित पवारांची राजकीय खेळी? ‘या’ राजकीय खेळीमागचे कारण काय?

June 29, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
पॉवर गेम! ‘राष्ट्रवादी’ नक्की कुणाची? आज होणार स्पष्ट; दोन्ही गटाच्या बैठकांकडे…

शरद पवार गटाच्या सोलापूर जिल्ह्यातील आमदाराकडून पेपरात अजितदादांच्या ‘घड्याळा’ची जाहिरात; पेपर वाचताच पक्षात खळबळ माजली

June 23, 2025
Next Post
सोलापूर ब्रेकिंग! चारधाम यात्रेचे अमिष दाखवून भाविकांना लाखोंचा गंडा; चौघाविरूध्द गुन्हा दाखल

सोने सोडवतो म्हणून ३ लाखांची फसवणूक, फायनान्समध्ये कामाला असल्याची बतावणी; सोलापूर जिल्ह्यातील घटना

ताज्या बातम्या

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

July 13, 2025
महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य राखीव पोलिस दलात आता महिलांना संधी मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन नियमित पदे निर्माण करण्यास दिली मान्यता

July 13, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी खळबळ! मंदिर समितीच्या दर्शन मंडपाचा ठेका मिळवून देतो म्हणून विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर लाचेचा गंभीर आरोप; फसवणूक झालेल्या व्यावसायिकांने पोलिसात दिली तक्रार

July 13, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता सातबाराची गरज भासणार नाही ; फक्त ‘हा’ क्रमांक असणार बंधनकारक

July 13, 2025
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रकृतीबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती; म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार; नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून यांची लागणार वर्णी?

July 12, 2025
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

भयानक! वडिलांचे सहामहिन्यांपूर्वी निधन, जमीन नाही, स्वतःचे हक्काचे घर नव्हते, हलाखीच्या परिस्थितीमुळे मानसिक तणावाखाली १४ वर्षीय तरुणाची आत्महत्या

July 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा