मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या शहरांमधील जिम्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव तात्पुरत्या स्वरुपात आज मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत दिली आहे.
कोरोनासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभे निवेदन दिलं. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. तसंच सुदैवाने अजूनही 17 लोकांना गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसत नाही आहेत, पण वेळेमध्ये जर का आपण सावध झालो आणि काही दक्षता घेतल्या तर पुढील येणारा धोका आपण टाळू शकतो, असं ते म्हणाले.
ज्यांना ज्यांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यातील दोघे सोडले तर सर्व दुबई, फ्रान्स व अमेरिका येथे प्रवास करून आलेले होते.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज