टीम मंगळवेढा टाईम्स । दामाजी कारखान्याच्या बेकायदेशीर नोटीसा रद्द होणार असून सभासदांना दिलासा मिळणार असल्याची माहिती दामाजीचे माजी चेअरमन अॅड.नंदकुमार पवार यांनी दिली आहे.
हेही वाचा – सभासदांना देण्यात आलेल्या ‘त्या’ नोटिसाबाबत मोठा खुलासा
– अक्रियाशील सभासद केल्याची नोटीस बेकायदेशीर : अॅड.पवार
अॅड.पवार म्हणाले,श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने कोरोनाची महामारी चालू असताना ती संधी समजून सुमारे 19 हजार सभासदांची अक्रियाशील अशी बेकायदेशीर वर्गवारी करून सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्यासाठी नोटीसा दिल्या. कोरोनाच्या भयंकर परिस्थितीत प्रत्येक सभासदांना अपील करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अपील करणे ही खूप खर्चिक बाब होती. विचित्र पेचात सभासद सापडला होता. याबाबत आम्ही शरदचंद्रजी पवार,सुशिलकुमार शिंदे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना ई मेल करून निवेदने,कागदपत्रे पाठविली. भेटता येत नव्हते,पोस्टव्यवहार बंद होता.फोनवरून सर्व वस्तुस्थितीबाबत चर्चा करून कल्पना दिली.
शरदचंद्र पवार यांनी दामाजी कारखान्यास सुरुवातीपासूनच मदत केली आहे. शरदचंद्र पवार यांच्याशी चर्चा झाल्यावर त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना दामाजी कारखान्याच्या बेकायदेशीर नोटीसीबाबत उपाययोजना करण्याबाबत कळविले.सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही आमच्याकडून सर्व परिस्थितीची माहिती घेतली. काही कागदपत्रे त्यांना पाठविली.
शरदचंद्र पवार व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून कारखान्याच्या बेकायदेशीर नोटीसा रद्द करण्याबाबतचा शासनाचा अध्यादेश दोन चार दिवसात काढण्याबाबत कार्यवाही सुरु केली आहे. सभासदांनी याबाबत काळजी करण्याचे कारण नाही.सर्व सभासद क्रियाशील राहून त्यांना त्यांचा घटनात्मक मतदानाचा अधिकार निश्चितच राहिल असे अॅड.नंदकुमार पवार यांनी म्हटले आहे.
mangalwedha Illegal notice of Damaji factory will be canceled Adv.Nandkumar Pawar
—————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज