मंगळवेढा टाईम्स न्युज ।
मंगळवेढा नगरपालिकेच्या दहा प्रभागासाठी प्रभाग रचना विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतर मुख्याधिकारी योगेश डोके यांच्या सहीनिशी नगरपालिकेच्या नोटीस बोर्डावर प्रकाशित केली असून सूचना व हरकतीसाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे.
राजकीय हालचाली देखील आता गतिमान होऊ लागल्या त्यामध्ये दहा प्रभागातून 20 नगरसेवक निवडले जाणार आहेत. यापूर्वी नगरपालिकेत थेट नगराध्यक्ष व 17 नगरसेवक कार्यरत होते. मात्र नव्या प्रभाग रचनेनुसार थेट नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवक इतकी संख्या झाली.
गेली चार वर्षे नगरपालिकेवर प्रशासक राज आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी विना नगरपालिकेचा कारभार सुरू असला तरी जनतेच्या दृष्टीने तो कारभार अधिक तापदायक ठरला अशा परिस्थितीत प्रशासकीय पातळीवर निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या.
20 मधील 10 जागी महिला असून त्यामध्ये 1 महिला राखीव, 3 इतर मागासवर्गीय 6 सर्वसाधारण महिला निवडल्या जाणार आहेत, नव्याने प्रकाशित करण्यात आलेली प्रभाग रचना अनेकांच्या सोयीनुसार झाल्याचे बोलले जात असले तरी प्रभागाच्या आरक्षण सोडती नंतर नगरपालिकेचे चित्र स्पष्ट होणार आहे.
प्रभाग क्रमांक :-1 – सदस्यसंख्या :-2 – लोकसंख्या :- 2284
प्रभागात समाविष्ट प्रभाग :- उजनी वसाहत कृष्ण नगर दामाजी गृहनिर्माण संस्था पंचायत समिती नागणेवाडी झोपडपट्टी एसटी बस स्थानक
क्रमांक :-2 – सदस्यसंख्या :-2 – लोकसंख्या :- 2021
प्रभागात समाविष्ट प्रभाग :- दामाजी मंदिर, दत्तू, गोवे, नागणे, मुलाणी, डोरले, मुढे, मुरडे गल्ली, खंडोबा मंदिर
क्रमांक :-3 – सदस्यसंख्या :-2 – लोकसंख्या :- 2029
प्रभागात समाविष्ट प्रभाग :- नागणेवाडी (कारखाना रोड), नागणेवाडी शाळा, दुर्गामाता नगर, साठे नगर, ग्रामीण रुग्णालय, दामाजी कॉलेज, सोलापूर रोड स्मशानभूमी, दूरदर्शन, अवताडे वखार, खंडोबा गल्ली.
क्रमांक :-4 – सदस्यसंख्या :-2 – लोकसंख्या :- 2372
प्रभागात समाविष्ट प्रभाग :- खंडोबा गल्ली, घुले गल्ली, चांभार गल्ली, रोहिदास गल्ली.
क्रमांक :-5 – सदस्यसंख्या :-2 – लोकसंख्या :- 2211
प्रभागात समाविष्ट प्रभाग :- किल्ला भाग,प्रांत कार्यालय, शिवप्रेमी मंदिर, मेटकरी गल्ली, बुरुड गल्ली, विठ्ठल मंदिर, महादेव मंदिर, लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय
क्रमांक :-6 – सदस्यसंख्या :-2 – लोकसंख्या :- 2129
प्रभागात समाविष्ट प्रभाग :- शनिवार पेठ, सनगर गल्ली, सांगोला नाका, बेरड गल्ली, शिवाजी तालीम, मारुती मंदिर, सनगर गल्ल, कृष्ण तलाव दक्षिण बाजू
क्रमांक :-7 – सदस्यसंख्या :-2 – लोकसंख्या :- 1954
प्रभागात समाविष्ट प्रभाग :- शिवाजी तालीम, वडर गल्ली, कैकाडी गल्ली, माळी गल्ली,
क्रमांक :-8 – सदस्यसंख्या :-2 – लोकसंख्या :- 2054
प्रभागात समाविष्ट प्रभाग :- कोंडूभैरी गल्ली, होनमाने गल्ली, डांगे- भुई गल्ली, जुनी कडबे गल्ली, मुरलीधर चौक
क्रमांक :-9 – सदस्यसंख्या :-2 – लोकसंख्या :- 2302
प्रभागात समाविष्ट प्रभाग :- न्हावी गल्ली, सराफ गल्ली, मुजावर गल्ली, काझी गल्ली, मारवाडी गल्ली, गैबी दर्गा व व्यापार संकुल, भाजी मंडई, कुंभार गल्ली.
क्रमांक :-10 – सदस्यसंख्या :-2 – लोकसंख्या :- 2368
प्रभागात समाविष्ट प्रभाग :- भीम नगर, सराफ गल्ली, काझी गल्ली, कोळी गल्ली, बोराळे नाका अशी गल्ली समाविष्ट करण्यात आली आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज