टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यातील ऊस तोडणी मजुरांची सरकार दप्तरी नोंद करून त्यांच्या बाजूचा कायदा व दरवाढीचा विषय जोपर्यंत घेतला जात नाही तोपर्यंत मजुर कोयता हातात घेणार नाही. सरकार राष्ट्रवादीचे आहे म्हणून दादागिरी चालणार, दादागिरीच्या जोरावर गोरगरिबांच्या अन्नात माती कालवणार असाल तर हे महाराष्ट्रात खपून घेणार नसल्याचा इशारा भाजपा आ.गोपीचंद पडळकर यांनी दिला
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे ऊसतोडणी मजूर, मुकदम यांच्या विविध मागण्या च्या संदर्भात बैठक घेण्यात आली या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. MLA Gopichand Padalkar’s warning to NCP
यावेळी माऊली हळदणकर,बापू मेटकरी, धनाजी गडदे,बंडू करे,तानाजी गरंडे, धोंडाप्पा करे,दादासो मदने आदी उपस्थित होते. MLA Gopichand Padalkar’s warning to NCP
यावेळी बोलताना आ.पडळकर म्हणाले की, वाहतूक कंत्राटदाराकडून कारखानदारांनी कोरे चेक घेवून त्याच्या बळावर पिळवणूक केली जाते.कायद्याने त्यांना संरक्षण मिळावे.त्याचा मागील 20 टक्के फरक मिळावा,ऊसतोड मजूर व बैलाचा विमा उतरवला पाहिजे बैलाच्या वैद्यकीय खर्चाची व्यवस्था कारखानदारांनी केली पाहिजे.
कष्टाने ऊसतोड करून मजूर बैलगाडीने वाहतूक केलेल्या व इतर वाहनांनी वाहतूक केलेल्या उसाचे कारखानदारांकडून काटामारी केल्यामुळे त्यांच्या कष्टाला घामाला योग्य दर मिळत नाही. सध्या राज्यामध्ये उसाचे क्षेत्र वाढल्याने कारखानदार तुमच्या मागे लागले आहे परंतु ज्यावेळी ऊस कमी असतो.
त्यावेळी करारासाठी त्यांच्या मागे जावूनही विचार करत नाहीत त्यामुळे सध्या मजूर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आल्याने मजुरांनी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हातात कोयता घेऊ नये व या भागातील जनतेनी ऊस तोडणी मजुरांच्या सोबत राहावे. वंचीत घटक व राजकीय वजन नसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून औद्योगिक वसाहत,कारखाने, सूतगिरणी, शिक्षण संस्था,उभ्या केल्या परंतु ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना साधं मजूर म्हणून देखील घेतले नाही.
29 कायदे मोडीत काढून चार कायदे केले पण ते मान्य करत नाहीत ऊस तोडणी मजुरास कामगार म्हणून मान्य नाही आता रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय थांबणार नाही जे कारखानदार दादागिरीच्या जीवावर ऊसतोडणी मजूर व वाहतूकदारावर दबाव टाकून कारखाने चालू करतील. त्यांच्या विरोधात ठाण मांडू असा इशारा देखील आ.पडळकर देत स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर व वाहतूक संघटनेच्या वतीने राज्यभरात केलेल्या कोयता बंद आंदोलनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
If you do grandfathering, remember the knot is with me; MLA Gopichand Padalkar’s warning to NCP
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज