मंगळवेढा टाईम्स टीम । कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन/संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील केश कर्तनालय, ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली असून ब्युटी पार्लर आणि केश कर्तनालयमध्ये येणाऱ्या व्यक्तींची नोंद ठेवावी, त्यासाठी स्वतंत्र रजिस्टर तयार करावे या आदेशाचे प्रथम उल्लंघन झाल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा नोंदणी परवाना रद्द करून दुकान बंद करण्यात येईल. या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्यात्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
या रजिस्टरमध्ये क्रमाक्रमाने येणाऱ्या ग्राहकांची नोंद करणे आवश्यक असणार आहे. दुकानदाराने ग्राहकांना संभाव्य वेळेची सूचना देऊन त्याच वेळी ग्राहकांनी दुकानात येण्याबाबत दुकानदाराने विनंती करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. केश कर्तनालय, ब्युटीपार्लरमध्ये या नोंदीच्या क्रमाने ग्राहक यांना सेवा द्यावी. पहिल्या ग्राहकांचे काम संपल्यानंतरच दुसरा ग्राहक सेवेसाठी दुकानात घ्यावा.
केशकर्तनालय व ब्युटी पार्लरमधील कारागीर व ज्या व्यक्तीचे केशकर्तन, दाढी करायची आहे अशा दोनच व्यक्ती दुकानांमध्ये असतील. उर्वरित व्यक्ती दुकानाबाहेर थांबतील. मोठ्या सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये दोन खुर्चीमध्ये कमीत कमी सहा फुटांचे अंतर ठेवावे, अशी सूचनाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे.
केशकर्तन कारागीर, ब्युटीपार्लर चालवणारी व्यक्ती यांच्या चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. सलून दुकानांमध्ये, ब्युटीपार्लरमध्ये एका ग्राहकाला सेवा दिल्यानंतर त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे एका ग्राहकाला वापरलेला टॉवेल किंवा अंगावर टाकलेले कापड दुसऱ्या ग्राहकाला वापरू नये. काही सलून अथवा ब्युटीपार्लरमध्ये फेसवॉशसाठी पाण्याच्या वाफेचा वापर केला जातो. त्यासाठी पाण्याचे वाफेत रूपांतर करणारी मशीन वापरली जाते. या मशीनवर लोखंडी किंवा स्टीलची हत्यारे निर्जंतुकीकरण करता येईल. बाकीचे हत्यारे सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुकीकरण करावे.
दुकानांमध्ये येणाऱ्या लोकांनी मास्क, सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक राहील. दुकान परिसरातील नियमित साफसफाई, स्वच्छता करावी व विशेष खबरदारी घेण्याबाबत सूचित करावे. या सूचनांचे पालन न करणाऱ्या दुकानदारावर कठोर कारवाई केली जाणार आहे. दुकानांमध्ये काम करणाऱ्या कारागिराने चेहऱ्यावर मास्क परिधान न केल्यास संबंधित व्यक्तीला पाचशे रुपयांचा दंड आकारला जाणार असून दुकानांमध्ये एकापेक्षा जास्त ग्राहकांना दुकानात घेण्यास मनाई केली आहे.
——————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज