मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
छडी लगे छमछम, विद्या येई घमघम’ हे बडबडगीत आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मात्र शिक्षकाने या छडीच्या मर्यादा ओलांडल्या तर भयंकर परिणाम होऊ शकतो. एका शिक्षकाने शिक्षा देताना घडलेल्या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.
त्या एका शिक्षेने शिक्षकाचं आयुष्य बदललं आहे. विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून पाच वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा प्रवास आता धक्कादायक वळणावर येऊन ठेपला आहे.
वडोदरा येथील एका खासगी शिकवणीच्या शिक्षकाने दहावीच्या विद्यार्थ्याला कानफटात मारली. या घटनेनंतर संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
धक्कादायक म्हणजे ही घटना २३ डिसेंबर २०१९ रोजी घडली होती. तब्बल पाच वर्षांनी या घटनेचा निकाल वडोदरा न्यायालयाने दिला आहे. विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकाला १ लाख रुपये दंड आकारण्यात आला असून थेट सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा देखील ठोठावण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं ?
जसबीरसिंह चौहान २३ डिसेंबर २०१९ रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र शिकवत होता.
त्याच्या वर्गातील एक मुलगा दोन दिवस शिकवणीला गैरहजर राहिला म्हणून शिक्षकाने त्याला वर्गातच जोरजोरात कानशिलात लगावल्या. या मारहाणीत त्याच्या कानाच्या पडद्यालाही इजा झाली आणि रक्तस्राव सुरू झाला.
इतक्यात विद्यार्थ्याचे आई वडील फॉर्म भरण्याकरिता शाळेत आले होते. घडलेली घटना पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पालकांना बघताच क्षणी जसबीरसिंह याने त्यांची माफी मागितली.
मात्र संतप्त झालेल्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि जसबीरसिंह विरोधात गुन्हा दाखल केला. तब्बल पाच वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर वडोदरा न्यायालयाने चौहान याला सहा महिने तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज