टीम मंगळवेढा टाईम्स । आंधळगाव वार्ताहर
ग्रामपंचायतीच्या लागलेल्या निवडणूकीने गावातील राजकारण ढवळून निघाले आहे. गावचे नेते आपल्या गावात आपलाच सरपंच कसा होईल, ग्रामपंचायतीवर आपलाच होल्ड कसा राहील यासाठी प्रयत्नशील आहेत.
परंतु या निवडणुकीत अप्रत्यक्षरित्या होणारा खर्च, वेळ व नेत्यांची प्रतिष्ठा हे सर्वच पणाला लागणार आहे. तरी गावच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून सर्व नेतेमंडळींनी एकत्रित येत ही निवडणुक बिनविरोध पार पाडावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल वेळापूरे यांनी प्रमुख गटाकडे केली आहे.
आंधळगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचासह १४ जागांसाठी ६५ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी सरपंचपदासाठी १२, तर सदस्यपदासाठी ५३ अर्ज दाखल आहेत.
आंधळगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे जनरल असुन पाच प्रभागातून १३ सदस्य संख्या आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये २ जागांसाठी ८, प्रभाग क्रमांक २ मध्ये २ जागांसाठी ८, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ३ जागांसाठी १३,
प्रभाग क्रमांक ४ मध्ये ३ जागांसाठी १३, तर प्रभाग क्रमांक ५ मध्ये ३ जागांसाठी ११ जणांनी असे एकूण १३ सदस्यपदासाठी ५३ जणांनी आपले उमेदवारी अर्ज भरून तयारी सुरू केलेली पहावयास मिळत आहे.
भावकी-गावकी, गट-तट आदींच्या राजकारणात विकासकामांना देखील खीळ बसत असल्याचे चित्र अनेकवेळा पाहायला मिळते. हेवेदावेच्या राजकारणात गावाच्या विकासाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. त्यामुळे सामान्य जनतेचे नुकसान होत असते.
२५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. तरी बिनविरोधासाठी नेतेमंडळींच्या हातात अजून वेळ असुन सर्वांनी एकत्रित येऊन चर्चा करावी अन्यथा निवडणूक बिनविरोध नाही झाली तर निवडणुकीसाठी उमेदवारांचा अप्रत्यक्षरीत्या अमाप खर्च होणार आहे.
तरी नेतेमंडळी गट-तट विसरून एकत्रीत येऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून आपला गाव आपले कुटुंब समजून सर्वांगीण विकास साधावा तसेच मंगळवेढा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे संवेदनशील गाव म्हणून आंधळगावाची ओळख आहे.
निवडणूक बिनविरोध झाल्यास एक चांगला पायंडा ग्रामपंचायतींवर नक्कीच पडेल. त्यादृष्टीने नेतेमंडळी पाऊले उचलावीत अशी मागणी आंधळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल वेळापुरे यांनी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज