टीम मंगळवेढा टाईम्स ।
मी पोलिस ठाण्याचा डॉन आहे, तु मला ओळखत नाहीस का असे म्हणत मंगळवेढा पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदाराला त्यांच्या कक्षात येवून धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी धुळदेव जगन्नाथ अनुसे (रा.धर्मगाव रोड,मंगळवेढा)याला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडून गजाआड केले आहे.
दरम्यान,यापुर्वीही दोन वेळा या व्यक्तीने पोलिस ठाण्यात धुडघूस घालून पोलिसांवर हल्ला करीत शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याची घटना घडली होती.
यातील फिर्यादी तथा ठाणे अंमलदार पोलिस हवालदार गणेश सुखदेव पवार (रा.पंढरपूर) हे दि.5 रोजी रात्री 8.00 वा.अंमलदार कक्षात सरकारी गणवेशात हजर असताना यातील आरोपी धुळदेव जगन्नाथ अनुसे हा तक्रार देण्यासाठी आला असता
फिर्यादीस नाव, पत्ता विचारले असता मी पोलिस ठाण्याचा डॉन आहे तु मला ओळखत नाहीस का असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून ठाणे अंमलदार कक्षात येवून फिर्यादीस धरून धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक वाघमारे हे करीत आहेत. दरम्यान, आरोपीने तात्काळ पलायन करताच पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी त्यांच्या सहकार्यासह पाठलाग करून पोलिस ठाण्याच्या काही अंतरावर त्याला फिल्मी स्टाईलने पकडून जेरबंद केले.
या पुर्वीही वरील आरोपीने दोन वेळा पोलिस ठाण्यात येवून धुडघुस घालून खिडक्यांची तावदाने व अन्य साहित्याची मोडतोड केली होती.
तसेच मध्यंतरी पोलिस ठाण्यात चक्क धारधार हत्यार घेवून येवून धिंगाणा घातल्याने पोलिसांची पळती भुई थोडी झाली होती.तो हातात शस्त्र घेवून रात्रीच्यावेळी येत असल्यामुळे ठाणे अंमलदार कक्षात महिला पोलिसही सीसीटीएनएसला कार्यरत असतात त्यामुळे त्याही घाबरून आहेत.
मागील दोन घटनाचा अनुभव पाहता पोलिस कर्मचारीही रात्रीच्यावेळी डयुटी करण्यास धजावत असल्याची चर्चा सुरु आहे.
वारंवार होणार्या घटनेमुळे पोलिसही वैतागले असून कायदेशीर कारवाई करून योग्य बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव
या आरोपीला हद्दपार करण्यासाठी त्याचा प्रस्ताव प्रांताधिकार्याकडे पाठविण्यात आल्याचे पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज