टीम मंगळवेढा टाईम्स।
माणगंगा परिवार अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि., मंगळवेढा यांच्यावतीने लक्ष्मीनारायण मंगलकार्यालय येथे वित्तीय साक्षरता सेमिनार आयोजित करण्यात आला होता. सदर सेमिनार साठी आर्थिक सल्लागार व ट्रेनर संदिप पाटील यांनी उत्तम मार्गदर्शन केले.
यावेळी लॉकरचे भव्य उद्घाटन संदिप पाटील यांच्या हस्ते डिजीटल पध्दतीने करण्यात आले. त्यांनी पैशाचे सुयोग्य नियोजन कसे करावे तसेच करोडोपती कसे व्हाल, वैयक्तीक मुल्य व पैसा, वित्तीय साक्षरता गरजेची का?
महागाईचा मासिक बजेटवर परिणाम, गुंतवणूक करावी का कर्ज फेडावे ? कर्जाची परतफेड मुदतपूर्व कशी करावी, कर्जाचे व्याज कसे कमी करावे या विषयावर मुद्देसुद व सविस्तर मार्गदर्शन केले.
चेअरमन नितीन इंगोले यांनी प्रास्तविकात, आपला परिवार माणगंगा परिवार या ब्रिद वाक्याने सुरुवात केली.
मंगळवेढ्यात प्रथमच आर्थिक विषयाबद्दल सेमिनार आयोजित करणारी ही पहिलीच संस्था असेल. या संस्थेला अल्पावधीतच मिळालेल्या प्रतिसादाबद्दल मंगळवेढेकरांचे अभिनंदन व्यक्त केले.
याप्रसंगी नगरपालिकेचे माजी अभियंता नामदेव काशिद व जनार्धन शिवशरण यांनीही संस्थेबद्दल मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थापक चेअरमन नितीन इंगोले, अर्चना इंगोले, व्हा.चेअरमन नितीन खटकाळे, संचालक सचिन इंगोले, धनंजय पवार, महादेव शिंदे,
विजयकुमार वाघमोडे, विवेक घाडगे, नामदेव काशिद, दै.दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे, लहू ढगे, शुभदा पटवर्धन, जनार्धन शिवशरण, शरद पवार, आकाश पुजारी, मधुकर भंडगे,
प्रा.संतोष फटे, माधवानंद आकळे, आकाश पुजारी, संस्थेचे सीईओ स्वप्निल काळुंगे, व्यवस्थापक सतिश गायकवाड, अक्षय मुढे, संतोष शिंदे, बाजीराव म्हमाणे, अभिजीत पाटील, तुषार इंगळे,
शिला जाधव, भाग्यश्री काशिद, प्रमोद जाधव, अभिषेक येडसे, वैभव जगताप यांच्यासह सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होता. सुत्रसंचलन विवेक घाडगे यांनी केले तर आभार सचिन इंगोले यानी मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज