मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार वेगळी चूल मांडणार असल्याची बातमी आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत 30 आमदार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे एकूण 9 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. संध्याकाळी 6 वाजता हा शपथविधी होईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात एकूण 54 आमदार आहेत. त्यातल्या 30 ते 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे. छगन भुजबळ हे अजित पवारांसोबत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड केली होती. ते सुद्धा अजित पवारांसोबत आहेत.
शरद पवारांचे निकटवर्तीय अजित पवारांसोबत
सध्या प्रफुल्ल पटेल, छनग भुजबळ आणि धनंजय मुंडे हे राजभवनात असल्याची माहिती आहे. राजभवनात शपथविधीची तयारी सुरु आहे. दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांना मंत्रीपद दिलं.
पण ते सुद्धा अजित पवारांसोबत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर नरहरी झिरवळ चर्चेत होते. ते सुद्धा अजित पवारांसोबत आहेत.
आज शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांची यादी
अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे, बाबूराव अत्राम
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज