mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्र हवीत.. जाणुन घ्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 8, 2021
in राज्य
शेतकऱ्यांनी लक्ष द्या! वारसनोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

शेतजमीन ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या वारसांना त्या जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद कशी करावी हे माहित असणे गरजेचे आहे.

आता जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्जही करता येतो. Online अर्ज कसा व कुठे करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्र हवीत? त्याची प्रक्रिया काय आहे याबाबत आोण आज जाणुन घेणार आहोत.

वारसाच्या नोंदीसाठी आवश्यक गोष्टी –

खातेदाराचा मृत्यू झाल्यास ३ महिन्यांच्या आत वारस नोंदणीकरिता अर्ज देणे अपेक्षित असते.अर्जात मृत खातेदार किती तारखेस मयत झाला आहे.

त्याच्या नावावर कोणकोणत्या गटातील किती क्षेत्र आहे. मयत खातेदारास एकूण किती जण वारस आहे याची माहिती असते.अर्जासोबत मयत व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला, त्याच्या नावावरील जमिनीचे ८ अ चे उतारे, सर्व वारसांचे पत्ते, वारसाचे मयत व्यक्तीबरोबर असलेले नाते व शपथेवरील प्रतिज्ञापत्र सादर केले पाहिजे.

नोंदी घेत असताना व्यक्तीचा जो धर्म आहे त्या कायद्यानुसार होतात. हिंदू व्यक्तीच्या बाबत हिंदू तर मुस्लिम व्यक्तीच्या बाबत मुस्लिम वारस कायद्याचे नियम पाळले जातात.

वारसाच्या नोंदीची प्रक्रिया –

सर्व प्रथम मयत खातेदाराचा मृत्यू दाखला वारसांनी काढावा. मृत्यू नंतर ३ महिन्यांच्या आत सर्व वारसांची नावे नमूद करून वारस नोंदीसाठी अर्ज सादर करावा.वारस नोंदीसाठी आलेला अर्जाची नोंद रजिस्टरमध्ये केली जाते. नंतर वारसांना बोलावले जाते. गावातील सरपंच, पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिकांना विचारणा करून वारसांनी अर्जात दिलेली माहितीची चौकशी करून वारस रजिस्टरमध्ये वारस ठराव मंजूर केल्यानंतर फेरफार रजिस्टर नोंद घेतली जाते. नंतर सर्व वारसांना नोटीस दिली जाते.

किमान १५ दिवसांनंतर या फेरफार नोंदीबाबत कायदेशीररित्या आदेश काढला जातो. त्यानंतर वारसाची नोंद प्रमाणित केली जाते /रद्द केली जाते.

वारस प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे –

विहित नमुन्यातील कोर्ट फी स्टँप लावलेला अर्ज व शपथपत्र
मृत्यू प्रमाणपत्र
तलाठी अहवाल / मंडळ अहवाल.
शासकीय नोकरीस असल्याचा पुरावा उदा. सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा उतारा.
मृत व्यक्ती पेन्शन असल्यास कोणत्या महिन्यापर्यंत शेवटचे पेन्शन उचललेल्या पानाची प्रत.
शिधापत्रिकेची (रेशन कार्ड) प्रत.
ग्रामपंचायत/नगरपालिका यांचा जन्म मृत्यूचा नोंद वहीतील उतारा.
सेवा पुस्तिकेत विहित नमुन्यातील वारसाचे नाव लिहिलेला असल्याचा पुरावा.
वारस हक्क प्रमाणपत्र व नॉमिनी (वारस हक्क व नॉमिनी हे दोन्ही वेगळे असतात)
बँक, विमा रक्कम इ.बाबत नॉमिनी म्हणजे मृत्यूनंतर संबंधित खातेदाराची रक्कम ज्या व्यक्तीकडे देण्यात यावी असे नमूद असलेले नाव त्यालाच ती मिळते.
विमा पॉलिसी धारकाने आत्महत्या केल्यास विमा क्लेम रक्कम ही नॉमिनी असलेल्या व्यक्तीला मिळत नाही.
वारस हक्क प्रमाणपत्र व्यक्तीच्या व संबंधित व्यक्तीच्या संपत्तीवर वारस नोंद, वहिवाट, इ. बाबींसाठी महत्त्वाचे असते.

जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज ही करता येतो.

जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?-

१) हा अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.

२) या पेजवर तुम्हाला खालच्या बाजूला एक ‘७/१२ दुरुस्तीसाठी ई हक्क प्रणाली’, अशी सूचना दिसेल व त्याखाली एक लिंक दिलेली आहे.
https://pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

३) त्यानंतर तुमच्यासमोर ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ नावानं एक पेज ओपन होईल. यावरील ‘Proceed to login’ या पर्यायावर क्लिक केलं की तिथं तुम्हाला आधी तुमचं अकाऊंट तयार करायचं आहे. त्यासाठी ‘Create new user’ यावर क्लिक करायचं.

४) मग ‘New User Sign Up’ नावाचं नवीन पेज उघडेल.
इथं तुम्हाला सुरुवातीला तुमचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर लॉग-इन डिटेल्समध्ये Username टाकून check availability या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पासवर्ड टाकून तो परत एकदा टाकायचा आहे. मग Security Questions मध्ये एक प्रश्न निवडून त्याचं उत्तर द्यायचं आहे.

५) ही माहिती भरून झाली की पुढे मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पॅन कार्ड नंबर आणि पिन कोड टाकायचा आहे. पिन कोड टाकला की देश, राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येईल. त्यानंतर Select Cityमध्ये तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे.

६) त्यानंतर Address Details मध्ये घर क्रमांक आणि गल्लीचं नाव किंवा घरावर काही नाव असेल तर ते टाकू शकता.

७) सगळ्यात शेवटी कॅप्चा टाकायचा आहे. इथं असणारे आकडे किंवा अक्षरं जशीच्या तशी लिहायची आहे, आणि मग save बटन दाबायचं आहे.

८) त्यानंतर या पेजवर खाली ‘Registration Successful. Please Remember Username & Password for Future Transaction.’ असा लाल अक्षरातला मेसेज तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्हाला ‘Back’ या पर्यायावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉग-इन करायचं आहे. आता आपण नोंदणी करताना टाकलेलं यूझरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग-इन म्हणायचं आहे.

१०) त्यानंतर ‘Details’ नावाचं एक पेज तुमच्यासमोर उघडेल. इथं Registration, Marriage, e-filing, 7/12 mutations असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसतील. याचा अर्थ इथं तुम्हाला या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातल्या ‘7/12 mutations’ वर क्लिक करायचं आहे.

११) त्यानंतर तुम्हाला यूझरचा प्रकार निवडायचा आहे. सामान्य नागरिक असाल तर ‘User is Citizen’ आणि बँकेचे कर्मचारी असाल तर ‘User is Bank’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
एकदा यूझरचा प्रकार निवडला की त्यानंतर ‘Process ‘ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

१२) त्यानंतर तुमच्यासमोर ‘फेरफार अर्ज प्रणाली- ई-हक्क’ नावाचे पेज ओपन होईल.
इथं सुरुवातीला गावाची माहिती भरायची आहे. जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे.

त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की, ‘तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा,’ असा मेसेज तुम्हाला दिसेल.

१३) आता आपल्याला वारस नोंद करायची असल्यामुळे आपण ‘वारस नोंद’ हा पर्याय निवडला आहे.त्यानंतर वारस फेरफार अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल. इथं तुम्हाला सुरुवातीला अर्जदाराची माहिती द्यायची आहे. यात अर्जदाराचं नाव, वडील किंवा पतीचं नाव आणि आडनाव, अर्जदाराचा ईमेल आणि मोबाईल नंबर टाकून ‘पुढे जा’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

१४) त्यानंतर स्क्रीनवर आपला अर्ज मसूदा जतन केला आहे असा मेसेज येईल आणि त्यासमोर अर्ज क्रमांक दिलेला असेल, या मेसेजखालील ‘ओके’ बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मयताचे नाव किंवा खाते क्रमांक टाकायचा आहे, सातबाऱ्यावरील खाते क्रमांक इथं टाकणं अपेक्षित आहे.

१५) पुढे ‘खातेदार शोधा’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मयताचे नाव निवडायचं आहे. एकदा ते नाव निवडलं की संबंधित खातेदाराच्या नावे असलेला गट क्रमांक निवडायचा आहे. नंतर मृत्यू दिनांक टाकायचा आहे.
त्यानंतर ‘समाविष्ट करा’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग निवडलेल्या खातेधारकाच्या जमिनीची सविस्तर माहिती तुम्हाला तिथं पाहायला मिळेल.

त्यानंतर अर्जदार हा वारसांपैकी आहे का? असा प्रश्न तिथं विचारण्यात येईल. तुम्ही वारसांपैकी असाल तर होय, नसाल तर नाही या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर वारसांची नावे भरा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
इथं आता तुम्हाला वारस म्हणून जी नावं लावायची आहेत, त्यांची माहिती भरायची आहे. यात नाव, वडील किंवा पतीचं नाव, आडनाव लिहायचं आहे. पुढे धर्म निवडायचा आहे, तुमच्या धर्मानुसार वारस कायद्याचे नियम पाळले जातात. त्यानंतर इंग्रजीत नाव लिहायचं आहे आणि मग जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर तुमचं वय आपोआप तिथं येईल. पुढे मोबाईल नंबर आणि पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकला की राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येईल.

पुढे पोस्ट ऑफिस निवडायचं आहे. त्यानंतर तालुका, गाव, घर क्रमांक आणि गल्लीचं नाव टाकायचं आहे. पुढे मयताशी असलेलं नातं निवडायचं आहे.

मुलगा, मुलगी, विधवा पत्नी, नातू, नात, सून – जे नातं असेल ते निवडायचं आहे. यापैकी नाते नसल्यास सगळ्यात शेवटच्या यापैकी नसल्यास या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि मग वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 आणि वर्ग-4 मध्ये दिलेल्या नात्यांपैकी एक नातं तुम्ही निवडू शकता.

ही सगळी माहिती भरून झाली की, साठवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर खालच्या रकान्यात तुम्हाला आता वारसासंदर्भात भरलेली माहिती तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर दुसऱ्या वारसाचं नाव नोंदवायचं असेल तर तिथं असलेल्या पुढील वारस या पर्यायावर क्लिक करायचं आणि आता जशी माहिती भरली तशीच माहिती त्या वारसासंदर्भात भरायची आहे आणि साठवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

अशारितीनं सगळ्या वारसांची नावे भरून झाली की पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि कागदपत्रे जोडायची आहे.

इथं तुम्हाला मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करायची आहे. ही प्रत ग्रामपंचायत कार्यालयात मिळते. इतर कागदपत्रांमध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती देण्याहेतूनं रेशन कार्ड जोडू शकता. मृत व्यक्तीच्या नावावरील जमिनीचे ८ अ चे उतारेही तुम्ही जोडू शकता.

तसंच एका कागदावर एक शपथपत्रं लिहून ते इथं जोडणं अपेक्षित असतं. यात मृत व्यक्तीच्या सगळ्या वारसांची नावं, त्यांचा पत्ता नमूद करणं गरजेचं असतं.

कागदपत्रे जोडल्यानंतर तिथं फाईल अपलोड झाली असा मेसेज येतो.

त्यानंतर तुम्हाला तिथं एक स्वयंघोषणापत्र दिसेल.
सगळ्यात शेवटी या पत्राच्या खालील सहमत आहे/Agree या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर वारस नोंदीसाठीचा तुमचा अर्ज गावातल्या तलाठी कार्यालयात जमा केला जाईल.

त्यानंतर तिथं या अर्जाची छाननी केली जाते आणि पुढील प्रक्रिया करून सातबारा उताऱ्यावर वारसांची नावं नोंदवली जातात.(HELLO महाराष्ट्र)

– अ‍ॅड. स्नेहल जाधव
(लेखिका व्यवसायाने वकिल असून त्या कायदादूत संस्थेच्या संस्थापक आहेत)

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रक्रियावारस नोंदसातबारा
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; केंद्राच्या धर्तीवर राज्याचाही सहा हजारांचा कृषी सन्मान निधी; एसटी प्रवासात 50 टक्के सूट

मोठी बातमी! ‘या’ जिल्ह्याचे नाव बदललं, आता अहिल्यादेवीनगर म्हणायचं; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

May 31, 2023
गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

नमो! शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये आणि १ रुपयांत पीक विमा, मंत्रिमंडळाचा निर्णय

May 31, 2023
मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांची बदली, राजश्री पाटील यांची नियुक्ती

मोठी बातमी! मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांची बदली; ‘हे’ असतील नवे DYSP

May 30, 2023
विद्यार्थ्यांनो! दहावी-बारावीनंतर ‘हे’ करा कॉम्प्युटर कोर्स, नोकरी व सर्वोत्तम करिअरसाठी फायदेशीर; अधिक माहिती जाणून घ्या..

विद्यार्थ्यांनो! बारावीचा निकाल आज जाहीर होणार; कुठे पाहता येणार निकाल? SMS वरती निकाल कसा पाहाल?

May 25, 2023
अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

राष्ट्रवादी, ठाकरे गट, काँग्रेसची संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी चर्चेत; व्हायरल यादीत कुणाची नावं? सोलापूर, माढामध्ये…

May 24, 2023
सोलापूर जिल्ह्यातील अकरा ग्रामपंचायतींना सुंदर गाव पुरस्कार; मंगळवेढ्यातील ‘या’ गावाचा समावेश

सरपंचाने गावकऱ्यांसमोर मांडला कमिशनचा हिशोब; महिला सरपंचाने ग्रामस्थांना दिला आश्चर्याचा धक्का; खर्च, कमिशन संपूर्ण गोषवारा पुस्तकात केले नमूद

May 24, 2023
पुन्हा नोटाबंदी! 2 हजारांची नोट चलनातून बाहेर; आरबीआयचा मोठा निर्णय

नागरिकांनो! 2 हजाराच्या कितीही नोटा बँक खात्यात जमा करू शकता; ओळखपत्राची, फॉर्म भरण्याची गरज नाही

May 22, 2023
शेतकऱ्यांना कष्टाचे फळ मिळणार; पहिल्या हंगामात ऊसाला ‘एवढा’ दर देणार; अभिजित पाटील चेअरमन होताच केली मोठी घोषणा

धाराशिव साखर कारखान्यात बायोगॅस व सीएनजीचे उत्पादन सुरू; चेअरमन अभिजित पाटील यांची माहिती

May 21, 2023
पुन्हा नोटाबंदी! 2 हजारांची नोट चलनातून बाहेर; आरबीआयचा मोठा निर्णय

पुन्हा नोटाबंदी! 2 हजारांची नोट चलनातून बाहेर; आरबीआयचा मोठा निर्णय

May 20, 2023
Next Post
वायरमनला अतिरिक्त कामाचा बोजा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढा महावितरणचे कर्मचारी असुरक्षित

सोलापूर जिल्ह्याचा 'तो' युवक पाकिस्तानमध्ये कसा पोहोचला? 7 वर्षानंतर परतला; पण या काळात काय काय घडलं?

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी व महिलांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; केंद्राच्या धर्तीवर राज्याचाही सहा हजारांचा कृषी सन्मान निधी; एसटी प्रवासात 50 टक्के सूट

मोठी बातमी! ‘या’ जिल्ह्याचे नाव बदललं, आता अहिल्यादेवीनगर म्हणायचं; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

May 31, 2023
खळबळ! दारूच्या नशेत गळपास घेऊन आत्महत्या; मंगळवेढा तालुक्यातील घटना

धक्कादायक! खासगी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; चौघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

May 31, 2023
गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

नमो! शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये आणि १ रुपयांत पीक विमा, मंत्रिमंडळाचा निर्णय

May 31, 2023
मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांची बदली, राजश्री पाटील यांची नियुक्ती

मोठी बातमी! मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांची बदली; ‘हे’ असतील नवे DYSP

May 30, 2023
शेतकऱ्यांनो! सहकार शिरोमणीची थकीत बीले दिल्यानंतरच कारखाना सुरू करणार; अभिजीत पाटील यांची ग्वाही

सभासदांनी मतदान रुपी आशीर्वाद द्यावा थकीत उसाची बील देण्याची सोय मी करतो; सहकार शिरोमणी सभासदांचा अभिजीत पाटील यांना वाढता प्रतिसाद

May 30, 2023
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त शिर्के मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या मोफत आरोग्य शिबीर

May 30, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा