टीम मंगळवेढा टाईम्स।
सांस्कृतिक , कला , साहित्यिक व प्रबोधन करणाऱ्या विविध उपक्रमांचे सातत्यपूर्ण आयोजन करुन छत्रपती परिवाराने गावचा लौकिक उंचावला आहे. गावाच्या नावाने सुरु असलेल्या फेस्टीव्हलमुळे मरवडेची ओळख सर्वदूर झाल्याचे गौरवोदगार आ.समाधान आवताडे यांनी काढले .
मरवडे फेस्टीव्हलच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या पुरस्कार प्रदान सोहळ्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी यंदाचा मरवडे भूषण पुरस्कार प्रा.डाॕ.संतोष सुर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला. सुर्यवंशी यांनी ‘अर्थसाक्षरता व सक्षमता ‘ हे ब्रीद घेऊन राष्ट्रीय स्तरावर अर्थतज्ञ म्हणून लौकिक मिळविला आहे.
यावेळी बोलताना आ.आवताडे यांनी मरवडे सारख्या ग्रामीण भागात दीर्घकाळ अशा चळवळी चालवून छत्रपती परिवाराने महाराष्ट्रातील युवक चळवळींपुढे आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी व्यासपीठावर दामाजी शुगरचे माजी चेअरमन अॕड.नंदकुमार पवार , उद्योगपती योगेश खटकाळे , सरपंच सौ.पुनम मासाळ , माजी सभापती भारत मासाळ, माजी संचालक सचिन शिवशरण, माजी सरपंच शिवाजी पवार, राहुल भोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मरवडे फेस्टीव्हल निमित्त देण्यात येणाऱ्या स्व.मुक्ताबाई आप्पा कुंभार साहित्य गौरव पुरस्कार देऊन डाॕ.आशुतोष रारावीकर(मुंबई), भारत सातपुते (लातूर), शिवाजी बागल या तिघांचा तर
स्व.भागवतराव पवार कला गौरव पुरस्काराने तर हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायिका श्रीमती शकुंतला जाधव ( मुंबई ) तसेच संगीत विशाद प्रसाद पाटील (सांगोला) यांचा सन्मान करण्यात आला.
तर गावचा लौकिक उंचावणार्या सुपुत्रासाठी देण्यात येणारा यंदाचा मरवडे भूषण पुरस्कार प्रा.डाॕ.संतोष सुर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला. सुर्यवंशी यांनी ‘अर्थसाक्षरता व सक्षमता ‘ हे ब्रीद घेऊन राष्ट्रीय स्तरावर अर्थतज्ञ म्हणून लौकिक मिळविला आहे.
तर स्व.ठकुबाई जाधव श्रावणबाळ पुरस्कार महेश कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. या सर्व गौरव मूर्तींना सन्मानचिन्ह , मानपत्र , फेटा , शाल , बुके व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी पुरस्कार प्राप्त गौरवमुर्तींच्या वतीने डाॕ. संतोष सुर्यवंशी , कवी भारत सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले .तर गायिका शकुंतला यांनी ‘ बाबू टांगेवाला ‘ हे गीत सादर करुन रसिकांची दाद मिळविली.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक संयोजक सुरेश पवार यांनी केले . यावेळी मान्यवरांचे स्वागत रावसाहेब सुर्यवंशी , सिद्धेश्वर रोंगे, बाळासाहेब कदम, संजय काळे, श्रीकांत लवटे, दत्तात्रय मासाळ यांनी केले . सूत्रसंचलन सचिन कुलकर्णी यांनी केले शेवटी आभार विजय पवार यांनी मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज