टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रात होमगार्ड भरती सुरू करण्यात आली आहे. पोलीस विभागाच्या सहकार्याने नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रम रावण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात 253 पुरुष आणि 60 महिला होमगार्ड पदासाठी भरती प्रक्रिया होत आहे.
या भरती प्रक्रियेसेठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 26 जुलै 2024 ते 16 ऑगस्ट 2024 पर्यंतची मुदत आहे.
होमगार्ड सदस्यत्त्वाचे फायदे
सैनिकी गणवेश परीधान करण्याचा मान आणि विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण.
3 वर्षे सेवापूर्ण होमगार्डना राज्य पोलीस दल, वनविभाग आणि अग्निशमन दलात 5 टक्के आरक्षण
प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन या सारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी.
गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार / पदके मिळवण्याची संधी.
स्वत:चा व्यवसाय / शेती इत्यादी सांभाळत देशसेवा करण्याची संधी.
होमगार्ड नोंदणी आणि अटी
होमगार्ड पात्रतेचे निकष
शैक्षणिक पात्रता
कमीत कमी 10वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता
वय – 20 वर्षे पूर्ण ते 50 वर्षांच्या आत (16 ऑगस्ट 2024 रोजी)
उंची – पुरुषांसाठी – 162 सें.मी. आणि महिलांसाठी 150 सें.मी.
छाती – फक्त पुरुष उमेदवारांकरीता (न फुगवता किमान 76 सें.मी. कमीतकमी 5 सें.मी. फुगविणे आवश्यक)
आवश्यक कागदपत्रे
रहिवासा पुरावा – आधारकार्ड, मतदान ओळखपत्र (दोन्ही अनिवार्य)
शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
जन्मदिनांक पुराव्यासाठी एसएससी बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला
तांत्रिक अर्हता धारणकरीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र
खाजगी नोकरीकरीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र
3 महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी अर्ज कसा करावा आणि याच्या संदर्भातील सरविस्तर जाहिरात पाहण्यासाठी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या लिंकवर क्लिक करा.
नोंदणी अर्ज भरण्याच्या सूचना
होमगार्ड नोंदणीचे अर्ज रायगड जिल्ह्यासाठी 26 जुलै 2024 ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या वेबसाईटवर भरता येतील. अर्ज भरण्यापूर्वी दिलेले माहिती पत्रक काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन माहिती फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाची आहे.
उमेदवार रायगड जिल्ह्यातील ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अतंर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत आणि पथकामध्ये अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील.
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच ‘मंगळवेढा टाईम्स न्युज’ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिती दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज