टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारत देशाचा जाणता राजा शिवछत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव 19 फेब्रुवारीला साजरा केला जातो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी करावी, असा आदेश गृह विभागाने नुकताच काढला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुकांना बंदी घालण्यात आली आहे.
मात्र, त्यावेळी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता अशा नियमांचे पालन करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. तर यावेळी कोरोना, मलेरिया, डेंगी यासह अन्य आजारांविषयी जनजागृतीवर भर द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दहा व्यक्तींशिवाय अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. महाराजांच्या प्रतिमेस अथवा पुतळ्याला पुष्पहार घालताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे संबंधितांना बंधनकारक असेल, असेही आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे.
गृह विभागाने या आदेशाची प्रत सर्व जिल्हाधिकारी, महापौर, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठविली आहे.
आदेशानुसार नमूद बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश गृह विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी हा आदेश नुकताच काढला आहे.
काय आहे आदेश…
गड-किल्ल्यांवर जाऊन जयंती साजरी न करता घरी बसूनच साजरा करावा उत्सव,सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये
प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी; महारांजाच्या पुतळ्यास अथवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचे करावे पालन,10 व्यक्तींच्या उपस्थितीतच साजरी करावी जयंती; आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यास असेल परवानगी, परंतु नियमांचे पालन बंधनकारक
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, महापालिका, पोलिस, स्थानिक प्रशासनाने करावी काटेकोर अंलबजावणी
शिवजयंतीनिमित्त आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज