टीम मंगळवेढा तगवळेवाडी (ता.माढा) येथे टिपरने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.बुधवारी दुपारी १२.३० च्या दरम्यान ही घटना घडली.
ज्ञानदेव रामचंद्र माळी (वय ६० , रा उंबरे (पागे) ,ता.पंढरपूर) असे त्यांचे नाव आहे. याबाबत पोलीस पाटील रविकांत गवळी यांनी टिपर चालकाविरुद्ध कुडूवाडी पोलिसात फिर्याद दिली.त्यानुसार गुन्हा नोंद झाला आहे.
अपघातातील टिपर हा रिव्हर्स घेत असताना पाठीमागून उंबरे पागे येथील ज्ञानदेव माळी हे मोटरसायकलवरून टिपरच्या पाठीमागून जात होते.टिपरचा रिव्हर्सचा वेग जास्त असल्याने त्याला जोराची धडक बसली.याच त्यांचा मृत्यू झाला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज