मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या राजे ग्रुपच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधत शहरातील शिवप्रेमी चौकात भव्य ऐतिहासिक स्वागत कमान उभा केली आहे.सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याने शहरात वर्दळ सुरू असून ही भव्य दिव्य ऐतिहासिक कमान सध्या लक्षवेधी ठरले आहे.या स्वागत कमान उपक्रमाचे कौतुक होत आहे.
शिवप्रेमी चौक हा मंगळवेढ्यातील शहराचा मध्य भाग समजला जातो.या चौकातून चोखामेळा चौकाकडे व नगरपालिकाकडे जाण्याचा रस्ता असल्याने शिवाय या चौकात प्रशस्त भाजी मंडई असल्याने या चौकात सतत नागरिकांची वर्दळ असते शहराची मुख्य बाजारपेठ समजले जाणाऱ्या या चौकात राजे ग्रुपच्या वतीने 40 बाय 50 फूट लांबी-रुंदीची ही ऐतिहासिक स्वागत कमान उभारण्यात आले असल्याने शहरातील प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.ही ऐतिहासिक अशा प्रकारची कमान उभी करण्यात आली आहे.
या कमानी मध्ये राजमाता जिजाऊ सह मावळ्यांच्या प्रतिमा प्रिंट करण्यात आले आहेत.ही स्वागत कमान मिरज येथे बनवण्यात आली असून यासाठी लाखो रुपये खर्च आला आहे.स्वागत कमानीच्या मध्यभागी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे प्रतिमा ठेवण्यात आली आहे.या स्वागत कमानी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याने सायंकाळच्या सुमारास ही स्वागत कमान पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
राजे ग्रुप च्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाने साजरा करण्यात येतो तसेच दामाजी चौकात स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात प्राणाची आहुती दिलेल्या स्वतंत्रविर असलेल्या सर्व लोकांच्या प्रतिमा ठेवण्यात येतात या ठिकाणी अनेकजण अभिवादन करण्यासाठी येतात.
—————–
मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज