mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

हेगडे कुटुंबाला न्याय मिळवून देवून शासकिय मदत मिळवून देणार : आ.समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 22, 2021
in मंगळवेढा, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

हेगडे कुटुंबाला न्याय मिळवून देवून दोषींवर कठोर कारवाई होण्यास भाग पाडू,शासकिय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी हेगडे कुटुंबास धीर देताना सांगितले.

याप्रसंगी सचिन शिवशरण, अशोक केदार, सरपंच दामू कांबळे, उपसरपंच परमेशर येनपे,चिमाजी हेगडे, भीमा हेगडे, हरी हेगडे, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, सदस्य सर्जेराव गाडे, शिवाजी केंगार, रातीलाल केंगार, सोमा तोरणे, परशु आयवळे, हुसेन केंगार, सोमा हेगडे आदी उपस्थित होते.

आ.समाधान आवताडे पुढे बोलताना म्हणाले की, नागेश हेगडे यांच्या बाबतीत घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे.

हेगडे कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ.समाधान आवताडे यांनी सांगितले.

हेगडे कुटुंबाला न्याय हवा तपासात कुचराई झाल्यास  उपोषण करू; होलार समाज संघटनेची मागणी

नंदूर येथे मोलमजुरी,ऊसतोड करून उपजिविका करणारे कुटुंब, आज खऱ्या अर्थाने पोलीस खात्याच्या कारवाईत टार्गेट झाले, दारू विक्रेता म्हणून एकाच आठवड्यापूर्वी केसेस करून, कुटुंबातील अनेक सदस्यांना मारहाण केल्याची तक्रार नातेवाईकांनी आक्रोश ठोकून सांगण्याचा प्रयत्न केला.

त्याकडे पोलीस खात्यानी दुर्लक्ष केले, पूर्णतः दहशतीखाली असलेले हेगडे कुटुंबास शुक्रवारी पुन्हा केसेस करण्यात आलेल्या पोलिसांमुळेच आपला काळजाचा तुकडा गमविला.हेच सत्य असल्याचे मत होलार समाजाचे तालुकाअध्यक्ष शिवाजी केंगार यांनी सांगितले,

नंदुर गावात अनेकजण दारू विक्रेते आहेत, याची तक्रार पोलिसांकडे असूनही हेगडे कुटुंबाला का टार्गेट करण्यात आले, एकाच आठवड्यात दोनवेळा केसेस करून अखेर पोलिसांच्या हाती काय मिळाले, पोलीस हेगडे कुटुंबाच्या घरी गेले नसते.

पोलिसांची दहशत नसती,पोलीस मागे लागले नसते,तर नागेश हेगडे जीवाची पर्वा न करता पळालाच नसता. यामुळे मयत नागेश नाथा हेगडे याच्या मयताला पूर्णतः जबाबदार पोलीस खातेच आहे, ही गोष्ट वडील नाथा हेगडे यांनी सांगून ही त्याकडे दुर्लक्ष का, घटनास्थळी ही वास्तव परीस्थित समोर असताना,नंदुर गावचे समस्त नागरिक साक्षीदार माणून बोलत असताना,सतत नंदूर गावच्या नागरिकांवर अन्याय होतोय, हे दिसून येत आहे.

तालुक्यात पोलिसांच्या आशीर्वादानेच अवैध व्यवसाय सुरू आहेत, लॉक डाऊन काळातही सर्व धंदे जोमात असताना एखाद्या कुटुंबाला टार्गेट करून,दहशत करून, सतत केसेस करून अखेर एका अल्पवयीन युकाचा बळी घेतलेल्या पोलिसांनी आपले लपवून दुसऱ्यावर बोट करू नये, अन्यथा नागेश हेगडे कुटूंबावर झालेल्या अन्याविरोधात पोलीस खात्यासमोरच  उपोषण करू, असा इशारा होलार समाज संघटनेकडून देण्यात आला आहे.

मयत नागेश नाथा हेगडे (वय 24) हा पोलीस पाठलाग करत असल्याचे पाहून पोलिसाच्या भितीने भयभीत होऊन पळून जात असताना चक्कर आल्याने तो खाली पडून मयत झाल्याची तक्रार पोलिसात नातेवाईकांनी दिली आहे.

यावर कोणत्याही प्रकारे पडदा पडला नसून, हेतू पूर्व कामाने हेगडे कुटुंबाला त्रास देऊन नागेश हेगडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलिसांवर कारवाई तर झालीच पाहिजे, हेगडे कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे,अशी मागणी होलार समाजाने केली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.समाधान आवताडे

संबंधित बातम्या

दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

तारीख पे तारीख! भाजप आमदार समाधान आवताडेंनी सरकारवरच राग काढला; थकीत बिलांचा मुद्दा पेटला; नेमके काय आहे प्रकरण?

December 13, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत मतदारांचे लाड, मतांसाठी उमेदवारांनी अक्षरशः खादाडी स्पर्धाच केली सुरू; जेवणावळी, मसाला दूध.. आता पुढे काय? नागरिकांमध्ये लागली उत्सुकता

December 13, 2025

नागरिकांनो! ‘या’ दिवशी आठवडा बाजार राहणार बंद; मतदान केंद्राच्या १०० मीटर परिघात प्रवेश करण्यास निर्बंध

December 13, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

भरधाव वेगात आलेल्या कारने तिघांना उडवले, एकाचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी; मंगळवेढ्यात भीषण अपघात; काळजाचा थरकाप उडवणारी बातमी; कार चालक फरार

December 12, 2025
बांधकाम मटेरियल तपासून देण्यासाठी लाच स्वीकारताना महिला अभियंत्यांसह दोघांना रंगेहात पकडले

मोठी बातमी! तलाठींच्या गैरव्यवहारामुळे मंगळवेढ्यात शेतकऱ्यांना त्रास; जिल्हाधिकाऱ्यांनी केली त्वरित निलंबनाची कारवाई

December 12, 2025
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम वाळू निर्मिती केंद्रे उभारली जाणार; ‘या’ तारखेपर्यंत ऑफलाइन प्रस्ताव दाखल करण्याची सूचना; शासनाने नवीन धोरण केले जाहीर

December 13, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

भामटेपणाचा कहर! सिस्टीममध्ये फेरफार करून ‘या’ परीक्षेमध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष, १ कोटी १० लाख रुपये उकळले; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार; विद्यार्थी, पालकांनो सावधान

December 12, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

ग्रामस्थांनो! तालुक्यातील ‘इतक्या’ गावांची करण्यात येणार निवड; बीडीओ, विस्ताराधिकारी असणार मुक्कामी; मुख्यमंत्री राज्य अभियान समृद्ध पंचायत

December 12, 2025
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील सर्व कारखान्यांनी कोल्हापूर पध्द्तीने पहिली उचल व संपूर्ण बिलाबाबत घोषणा करावी; उपसरपंच बालाजी गरड

December 10, 2025
Next Post
Breaking! बालविवाह लावल्याप्रकरणी आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात वेळेपेक्षा जास्त वेळ दुध डेअरी चालू ठेवल्याप्रकरणी दुध डेअरी चालकांवर गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

मित्रानेच मित्राचा विश्वासघात केला! व्यापाराच्या दुकानात बसायचा, संधी साधून पैसे खिशात टाकायचा; धक्कादायक प्रकार उघड

December 13, 2025
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

तारीख पे तारीख! भाजप आमदार समाधान आवताडेंनी सरकारवरच राग काढला; थकीत बिलांचा मुद्दा पेटला; नेमके काय आहे प्रकरण?

December 13, 2025
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर; ‘ही’ आहेत योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

December 13, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत मतदारांचे लाड, मतांसाठी उमेदवारांनी अक्षरशः खादाडी स्पर्धाच केली सुरू; जेवणावळी, मसाला दूध.. आता पुढे काय? नागरिकांमध्ये लागली उत्सुकता

December 13, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटलांना राजकीय पक्षाकडून आता थेट अध्यक्षपदाची ऑफर; राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?

December 13, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट, निवडणूक आयोगाने निर्णय कळवला; इच्छुकांची धडधड वाढली

December 13, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा