टीम मंगळवेढा टाईम्स ।
१ जानेवारी रोजी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. परंतु आता वर्षातून चार वेळा मतदाराची नाव नोंदणी होणार आहे. यामुळे नवे मतदार वाढणार आहेत.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात ५ जानेवारी २०२२ अखेर पुरुष मतदार १ लाख ७२ हजार २६४ व स्त्री मतदार १ लाख ६६ हजार ८८२ तर, इतर १३ असे एकूण ३ लाख ४९ हजार १५९ मतदारांची नोंद होती.
जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ या दरम्यान मतदार यादीमध्ये दोन ठिकाणी असलेली ४ हजार २४५ नावे वगळण्यात आली आहे. तर ४ हजार २०९ नवीन मतदार वाढले आहेत.
९ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध प्रारूप मतदार यादीनुसार पुरुष मतदार १ लाख ८२ हजार १३२ व स्त्री मतदार १ लाख ६६ हजार ९७६ तर, इतर १५ असे एकूण ३ लाख ४९ हजार १२३ मतदारांची नोंद झाली आहे.
वंचित घटकांसाठी विशेष शिबिर
विद्यार्थी, दिव्यांग महिला, देहव्यवसाय करणाऱ्या महिला, घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती, तृतीयपंथी या लक्षित घटकांसाठी विशेष राबवण्यात येणार आहे.
दोन ठिकणी ४२४५ मतदार
जानेवारी ते नोव्हेंबर यादरम्यान मतदार यादीमध्ये दोन ठिकाणी असलेली नावे शोधून काढण्यात आली आहेत. यामुळे ४ हजार २४५ मतदार नावे दोन ठिकाणी असल्याचे निदर्शनास आले. यामुळे ही नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.
नोंदणी, नाव वगळण्यासाठी येथे करा क्लिक:
ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी https:/voterportal.eci.gov.in या संकेतस्थळावर भटे द्या. किंवा Voter Helpline हे मोबाइल अॅप वापरा. मतदार यादी पाहण्यासाठी ceo.maharashtra.gov.in зrera electoralsearch.in या संकेतस्थळावर क्लिक करा.
२०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या १ तारखेला किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण होणाऱ्यांना मतदार नोंदणी करता येणार आहे. शिवाय ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या दरम्यान विशेष मोहिमेंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे नवतरुणांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज