मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड विजय मिळाला या विजयात निवडणुकी दरम्यान महायुती सरकारने जनतेसाठी जाहीर केलेल्या विविध योजना आणि घोषणा गेमचेंजर ठरल्या होत्या.
त्यात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात राज्यातील ‘शेतकऱ्यांचे कर्जमाफ’ करण्याचा आणि शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या हमीभावावर २० टक्के अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, राज्यात महायुतीचे नवीन सरकार स्थापन होताच आपल्याच पक्षाच्या जाहीरनाम्यातून शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार विसरल्याचे दिसत आहे.
शनिवारी, पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना पवार यांनी विधानसभा निवडणुकीत आपण एकदाही ‘शेतकरी कर्जमाफी’ विषयी बोललो नसल्याचे म्हणत कर्जमाफीच्या मुद्द्द्यावरून हात झटकले आहेत. परंतु राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेसाठी प्रसिद्ध केलेल्या
‘महाराष्ट्रवादी घोषणापत्रात’ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे प्रमुख आश्वासन दिले होते. तसेच आपल्या निवडणूक प्रचारातही शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला होता. राष्ट्रवादी पक्षाला या निवडणुकीत शेतकऱ्यांची मते मिळविण्यासाठी कर्जमाफीच्या आश्वासनाचा मोठा फायदा झाला आहे.
राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार शेतकरीपट्ट्यातूनच निवडून आल्याचे स्पष्ट झाले आहे. आता विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले असताना
उपमुख्यमंत्री पवार यांनी मात्र आपल्याच पक्षाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांपासून यु-टर्न घेतल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. याचा फटका राष्ट्रवादीला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना राष्ट्रवादीने ६ नोव्हेंबर रोजी आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. यात राष्ट्रवादीने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन दिले होते.
तसेच लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करणे, शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान १२ हजारांहून वर्षाला १५ हजार रुपये करणे, महिला सुरक्षेसाठी पोलीस दलात २५ हजार महिलांची भरती, ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्ते निर्माण करणे यासारखी नवीन ११ आश्वासने दिली आहेत.
परंतु सरकार स्थापन होऊन काही दिवसच झाले असताना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांना या आश्वासनांचा विसर पडल्याचे दिसत आहे. अजित पवार हे नेहमीच आपण शब्दाला पक्के असल्याचे आणि दिलेला शब्द पाळणारा नेता असल्याचे जाहीरपणे सांगत असतात,
परंतु स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या जाहीरनाम्यातील कर्जमाफीचा शब्द अजित पवार खरंच विसरले ? की त्यांना आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यातून देण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या शब्दाची कल्पनाच नव्हती ? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज