टीम मंगळवेढा टाईम्स।
धनगर समाजाचे लाखो भाविकांचे आराध्य दैवत महालिंगराया व बिरोबा या गुरु-शिष्य पालखी भेट आज सोमवार, दि.१३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास हुलजंती येथे मंदिराच्या परिसरात असणाऱ्या ओढ्यात होणार आहे.
दरम्यान, देवस्थान समितीला न्यायालयाने स्थगिती दिल्याने तहसीलदार मदन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.
कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र या राज्यातून भाविक लाखोच्या संख्येने येत असतात. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे रविवारी अमावसाच्या रात्री स्वता शंकर पार्वती हे महालिंगराया मंदिराच्या कळसाला मुंडास गुंडाळून जातात, अशी भाविकांची श्रध्दा आहे. त्याला ध्वज असे म्हटले जाते.
येथील देवस्थान समितीचा वाद असल्याने परस्पर दोन गट न्यायालयात गेल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार यात्रेतील सर्व विधी व सेवा तहसीलदार मदन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहेत.
यात्रेसंदर्भात तहसीलदार मदन जाधव यांनी महालिंगराया मंदिरात व तहसीलदार कार्यालयात दोन बैठका घेतल्या असून यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, अग्निशामक वाहन, वैद्यकीय पथक, फिरते शौचालय, २४ तास वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून तसेच दक्षतेसाठी यात्रेत अनुचित प्रकार घडू नये म्हणून, मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
मंदिर परिसरात विकासकामे होणे गरजेचे होते, तेवढी कामे अद्यापही झाली नाहीत. भाविकांना राहण्यासाठी भक्तनिवास, स्वच्छतेसाठी शौचालय अशी भाविकांना गरजेची असलेली कामे येथे झाली नाहीत. अनेक राजकीय नेत्यांकडून तसेच मंत्र्यांकडूनही या मंदिराच्या विकासाचा केवळ बोलबाला केला जातो.
यामुळे धनगर समाजाचे आराध्य दैवत बिरोबा आणि महालिंगराया देवस्थानचा विकास झाल्यास परिसरातील अनेक नागरिकांनाही हॉटेल्स, इतर व्यावसायिकांना काम मिळणार आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या यात्रेमध्ये पोलिसांची विविध पथके तैनात असून, चोख बंदोबस्त लावल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजित माने यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज