टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवार, १९ जून २०२४ रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेली आचारसंहिता यांसह अन्य काही कारणास्तव गेल्या काही महिन्यांपासून ही बैठक झालेली नव्हती.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे १९ जून रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे; सकाळी ६.४५ वाजता सोलापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव.
सकाळी ८.४० वा. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी भेट. सकाळी १० वाजता सात रस्ता येथील जिल्हा नियोजन भवन आयोजित आषाढी वारी आढावा बैठकीस उपस्थिती.
याचठिकाणी सकाळी ११ वाजता सोलापूर जिल्ह्यातील पाण्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक, सकाळी ११.३० वाजता सोलापूर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक,
दुपारी १ वाजता जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन आराखडा सादरीकरण व जिल्हास्तरीय समिती आढावा बैठक, दुपारी १.१५ वाजता जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठकीस उपस्थिती.
दुपारी १.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे उद्घाटन,
दुपारी २ वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे हिरज येथील रेशीम कोष खरेदी-विक्री इमारतीचे उद्घाटन कार्यक्रम व रेशीम शेतकरी कार्यशाळेचे उद्घाटनास उपस्थिती.
दुपारी ४ वाजता सोलापूर शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण. दुपारी ४.१५ ते सायं ६.०० वा. शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सायंकाळी ०६.०० वाजता यड्राव (ता. शिरोळ) कडे प्रयाण.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज