मंगळवेढा टाईम्स न्युज ।
सोलापूर जिल्ह्यातील १० पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली एतीहासीक विजय मिळविला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी भारतीय जनता पार्टीवर आणि पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी मंत्री गोरे यांनी केंद्रीय वित्त आयोगातून जिल्हा परिषदेसाठी १४ कोटी ६१ लाख

तर ११ पंचायत समितीच्या सदस्यासाठी जवळपास १४ कोटी ६१ लाख असे तब्बल २९ कोटी २२ लाख रुपये देण्याचे अभिवचन दिले होते तो शब्द मंत्री गोरे यांनी पुर्ण केला असून नवनिर्वाचित सदस्यांना विकास निधीचे अनोखे गिफ्ट दिले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीमध्ये पालकमंत्री गोरे यांनी जनतेला विकासासाठी थेट निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. सदर आश्वासन हे केवळ निवडणूकीपुरते न ठेवता निवडणूकीनंतर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये निधी उपलब्ध करुन देण्याचे सुतोवाच गोरे यांनी केले होते.

त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्री गोरे यांनी त्यांच्याकडे असलेल्या महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडून दिनांक २३ मार्च २०२६ रोजीच्या

शासन निर्णयानुसार केंद्रीय वित्त आयोगाचे अनुदान सोलापूर जिल्हा परिषदेस १४ कोटी ६१ लाख इतका निधी तसेच जिल्ह्यातील ११ पंचायत समिती यांना एकुण १४ कोटी ६१ लाख असे एकुण सोलापूर जिल्ह्यास २९ कोटी २२ लाख इतका निधी प्राप्त झाला आहे.
त्यामुळे जि. प. सदस्य व पं. स. सदस्य यांनी मंत्री गोरे यांचे कोतुक करत आभार व्यक्त केले आहे. सदर निधी हा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात खर्च होणार असल्याने सर्वसामान्य जनतेने ही पालकमंत्री गोरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज
















