टीम मंगळवेढा टाईम्स ।
गिलनेट फिशरीज अँड ऍग्रोच्या माध्यमातून उद्योजक बाळासाहेब ताड यांनी पाटखळ सारख्या ग्रामीण भागात माशांचा उद्योग सुरू केल्याने अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
याप्रसंगी धनगर समाजाचे नेते तानाजी खरात ,पाटकळ सरपंच हर्षराज बिले, कृषी क्रांती क्लबचे अंकुश पडवळे, ग्रामपंचायतीचे सदस्य दत्तात्रय सावत,गिलनेट फिशरीज संचालक दत्ता झिंजुरटे, ऋतुराज बिले, अण्णासाहेब ताड,सागर ताड, अग्रिकल्चर ऍक्वाकल्चर बायोफ्लाकचे तज्ञ एजाज अन्सारी आदीजन उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे पुढे बोलताना म्हणाले की, कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न देणारी ही मत्स्यशेती असून ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना उद्योगाच्या माध्यमातून एक प्रकारची चांगली संधी निर्माण होत आहे.
ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येऊन हा व्यवसाय करण्याची संधी उद्योजक बाळासाहेब ताड यांनी मिळवून दिली आहे. दुष्काळी माळरानावरती ही मत्स्यशेती सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सुद्धा ही मत्स्यशेती आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून सुरू करावे असे आव्हान पालकमंत्री भरणे यांनी केले आहे.
मत्स्यशेती पाहण्यासाठी येथे करा संपर्क
मंगळवेढा-पाटखळ रोडवरील युटोपीयन साखर कारखान्याच्या समोर, गिलनेट फिशरीज अँड ताड फार्म हाऊस मोबाईल : 98 20 61 66 38 , 77 90 99 29 92
गिलनेट फिशरीज अँड ऍग्रो फायदे :
कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न मिळवून देणारी उच्चप्रतीची व्यवसाय शेती असून नवतरुण व महिलासाठी एक प्रकारची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
गिलनेट फिशरीजच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इस्त्राईल टेक्नॉलॉजी नुसार बायोफ्लाक मत्स्य शेती प्रोजेक्ट तयार करून दिले जाणार आहेत.
प्रोजेक्टसाठी लागणारी उपकरणे व माहिती आमच्याकडून दिली जाणार असून शासन द्वारा सबसिडी 40 ते 60 टक्के पर्यंत मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहणार आहे.तसेच शेतकऱ्यांना ऑर्डर प्रमाणे टॅंक तयार करून दिले जाणार असल्याचे गिलनेट फिशरीजचे संचालक बाळासाहेब ताड यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज