टीम मंगळवेढा टाईम्स ।
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आज गुरुवारी दि. ३ ऑक्टोबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. सकाळी तुळजापूर येथे भवानी मातेचे दर्शन घेऊन सोलापूरकडे येणार आहेत.
त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता रूपाभवानी मातेचे दर्शन घेणार आहेत. सोलापुरात मान्यवरांच्या गाठीभेटी घेऊन रात्री सिद्धेश्वर एक्स्प्रेसने मुंबईकडे रवाना होणार आहेत.
दुपारी चार वाजता येथील शासकीय विश्रामगृहात काही वेळ थांबणार आहेत. त्यानंतर साडेचार वाजता नियोजन भवनात त्यांचे आगमन होणार आहे.
त्यानंतर सायंकाळी येथील प्रसार माध्यमाच्या कार्यालयांना पालकमंत्री भेटी देणार आहेत. रात्री पावणे नऊ वाजता माजी महापौर किशोर देशपांडे यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. भेटीगाठीनंतर रात्री सिद्धेश्वर एक्स्प्रेसने मुंबईकडे रवाना होणार आहेत.
ईडी आरोपीची देशातील संपत्ती जप्त करू शकते मद्रास उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
विदेशात गुन्हेगारी कृत्यांतून निर्माण केलेल्या मालमत्तेच्या किमतीइतकीच त्या आरोपीची – देशातील मालमत्ता ईडी मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासात जप्त करू शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.
चेन्नईतील तीन कंपन्यांनी दाखल केलेल्या एका याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. या याचिकेत म्हटले होते की, व्यक्ती किंवा समभागधारकांनी केलेल्या गुन्ह्यांसाठी कंपनीला जबाबदार ठरविता येणार नाही.
कंपन्यांच्या काही मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. मात्र बँक कर्ज घोटाळ्याचे प्रकरण घडण्याच्या खूप आधी या मालमत्ता विकत घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या जप्त करण्याचा ईडीला अधिकार नाही.
न्या. एस. एम. सुब्रमण्यम, न्या. व्ही. शिवग्ननम यांच्या खंडपीठाने मंगळवारी म्हटले आहे की, देशाच्या आर्थिक हिताचे रक्षण करण्यासाठी अशी कारवाई आवश्यक आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज