मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
आजच्या युगात देखील ग्रामीण खेळ जतन करण्याचे काम सरपंच विनायक यादव व त्यांचे सहकारी करत आहेत. कोणत्याही खेळापेक्षा अट्यापट्या खेळात शरीराचा सर्वांगीण व्यायाम होत असल्याने तरुणांनी आट्यापाट्या खेळ खेळावा असे आवाहन माजी प्रा.येताळा भगत यांनी केले आहे.
मारापूर येथे जयमल्हार कला व क्रीडा मंडळ यांचे वतीने भव्य अट्यापट्याचे सामने भरविण्यात आले होते. या सामन्याचे उद्घाटन येताळा भगत सर यांचे उपस्थितीमध्ये व मारापुरचे लोकनियुक्त सरपंच विनायक माधवराव यादव आध्यकक्षतेखाली, माजी सभापती संभाजी गावकरे सर यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसरपंच अशोक आसबे सर, विक्रम यादव , आमोल जानकर , अबा जानकर , आनंदा पाटील , नाथा माने, भुजंग आसबे, उमेश आसबे, आशोकं यादव, संतोष गांडुळे, व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण भागातील रांगड्या खेळा साठी सोलापूर जिल्ह्या मधील तीस संघांनी सहभाग घेतला. ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठी असे मैदानी खेळ मारापूर मधील जयमल्हार कला व क्रीडा मंडळ प्रत्येक वर्षी भरवत असतात.
या सामन्यासाठी प्रथम क्रमांकासाठी २१०००/ द्वीतिय क्रमांकासाठी १५०००/ तृतीय क्रमांकासाठी ११०००/ चतुर्थ क्रमांकासाठी ७०००/. पाचवे क्रमांकासाठी ५०००/ अशी पारितोषिके ठेवण्यात आली होती.
या सामन्यामध्ये प्रथम क्रमांक शिरढोण तां. पंढरपूर. द्वितीय क्रमांक १४/१५ सेक्शन ता. माळशिरस. तृतीय क्रमांक घरनिकी ता मंगळवेढा . चतुर्थ क्रमांक शिरभवी ता.सांगोला. पाचवा क्रमांक आकोला ता. मंगळवेढा . असे पटकविण्यात आले.
या सामन्यासाठी मार्केट कमिटीचे सभापती सोमनाथ आवतडे, माजी सभापती प्रदिप खांडेकर, आभिजित पाटील, तावसीचे सरपंच पप्पू यादव, अनील वगरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष भगवान आसबे, बाळू यादव , बंडू पाटील, यांची उपस्थती होती.
सामने याशस्वी करण्याठी राजकुमार आसबे, सिधेस्वर माने, आनिल माने, हारी यादव गवळी, बापू आसबे, ओंकार आसबे, बालाजी यादव,योगेश आसबे, तात्या सातपुते, संभा यादव, व सर्व जयमल्हार कला व क्रीडा मंडळाचे पदाधिकारी यांनी घेतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज