टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 2 हजार 669 ग्रामपंचायतींसाठी येत्या पाच नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
यासोबतच 2 हजार 950 सदस्य आणि 130 सरपंचांच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान होणार आहे.
मात्र आता राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार? निवडणुका लांबणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
राज्यात निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचातय निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मात्र या ग्रामपंचायत निवडणुकीला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे.
नागपूरसह इतर जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण हे 50 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचा दावा याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेमध्ये केला आहे. निवडणूक घेण्यापूर्वी सरपंचपदाच्या आरक्षणात आवश्यक सुधारणा करण्याची मागणी याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेमध्ये केली आहे.
नागपूर जिल्ह्यातील जलालखेड्याचे सरपंच गुणवंत काळे यांनी नागपूर खंडपीठात ही याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण दिलं जाऊ शकत नाही, असं याचिकाकर्त्यानं म्हटलं आहे. आज या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ३ तारखेला राज्यभरातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. येत्या पाच नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यासोबतच 2 हजार 950 सदस्य आणि 130 सरपंचांच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज