टीम मंगळवेढा टाईम्स ।
गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने गौरी आगमनाच्या दिवशी जोरदार हजेरी लावली. महापूजा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन होत असतानाही चांगला पाऊस पडला. शेतकऱ्यांच्या संकटाला गौराई धावून आल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. पावसामुळे शेतातील पिकांना दिलासा मिळाला आहे.
यंदा पावसाळ्यात सर्वच नक्षत्रातील पावसाने निराशा केली आहे. आतापर्यंत २१२ मि.मी. (५१) टक्के पाऊस पडला असून तोही अत्यल्प आहे. चालूवर्षी अद्यापपर्यंत नद्या, नाले, ओढे, तलाव भरून व शेतातील बांध फुटून पाणी वाहून जाणारा एक ही दमदार पडला नाही.
तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे. विंधन विहिरींच्या पाणीपातळी खोलवर गेल्याने पिण्याच्या पाण्याची ही टंचाई निर्माण झाली आहे.
वेळेत पाऊस पडला नाही, म्हणून बहुतांशी भागातील खरीप हंगाम वाया गेला.शेतातील उभी पिके, फळबागा पाण्याअभावी करपल्याने शेतकरी पुरता पिचला आहे.
खरीप हंगामात पाऊस पडला नाही, म्हणून रब्बी हंगामात तरी पाऊस पडेल म्हणून शेतकरी आशेवर होता.
मात्र, ही आशा निरर्थक ठरली. गुरुवारी गौरी आगमनाच्या दिवशी तालुक्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली. उशिरा का होईना पाऊस पडल्यामुळे रब्बी ज्वारीच्या पेरणीला वेग येईल, असे बोलले जात आहे. तालुक्यात रब्बी हंगामात शेतकरी सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीनंतर उगवण झालेल्या पिकांना पाण्याची गरज होती.
दुसरीकडे रखडलेल्या पेरणीसाठी शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. अशातच शनिवारी गौरी विसर्जनादिवशी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे पावसाची चिन्हे दिसून येत होती, सायंकाळी पाचनंतर अचानक मेघ दाटून येताच पावसाला सुरुवात झाली
सुमारे अर्धा तास सर्वत्र दमदार पाऊस पडल्यामुळे सर्वाच्याच तोंडून गौराई पाऊस घेऊन आल्या आणि जातानाही पाऊस बरसवून गेल्या, अशा भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज