टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवरात्र महोत्सव दरम्यान मंगळवेढा तालुका मर्यादित लोककलावंतांचा लोककला महोत्सव आयोजित केला जाणार असल्याची माहिती काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी दिली.
मंगळवेढा तालुका हा सांस्कृतिक, कला कौशल्याचे माहेरघर असून संतांच्या या पवित्र भुमीला सामाजिकतेचा वारसा आहे. तोच वारसा जपण्यासाठी व तालुक्यातील लोककलावंतांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन केले
जाणार असून प्रत्येक कला प्रकारातील कलाकारांचे तीन विजेत्या कलाकारांना पारितोषिके दिली जाणार आहे.
या कला उत्सवात व्यक्तिगत कला तसेच सांघिक कला संच मध्ये भाग भाग घेता येणार आहे. तसेच या कला प्रकाराच्या स्पर्धा घेवून सादरीकरण होणार आहे.
महिला कलावंत व पुरूष कलावंतांना वेगळे व्यासपीठ असणार आहे. तसेच या प्रत्येक कला प्रकाराचे परीक्षण करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ञ परिक्षकाकडून त्यांचे परीक्षण केले जाणार असून तदनंतर अनुक्रमे तीन नंबर काढले जाणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज