टीम मंगळवेढा टाईम्स ।
भारतात गुगलची ई-मेल सेवा म्हणजेच जी-मेल अचानक बंद झाली आहे. ई-मेलसोबतच यूट्यूब, गुगल, गुगल ड्रायव्हदेखील डाऊन झाल्यामुळे अनेक युजर्सला मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
विशेष म्हणजे सध्या कोरोना संकटामुळे अनेक युजर्स वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्यांना जीमेल, गुगल ड्रायव्ह, यूट्यूब यांची गरज भासते.
मात्र, अचानक या सर्व सेवा बंद पडल्यामुळे यूजर्स त्रस्त झाले आहेत.
भारतात जीमेल आणि यूट्यूब सेवा डाऊन झाली आहे. अनेक वापरकर्त्यांना या समस्येला सामोरे जावे लागले आहे.
प्रसिद्ध वेबसाईट डाऊन डिक्टेटरच्या माहितीनुसार गुगल, यूट्यूब, जीमेल, गुगल ड्राईव्ह या सेवा वापरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गुगल अनॅलिटिक्स, गुगल स्प्रेडशीट वापरण्यातही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नेमकं कारण काय?
यूट्यूब आणि जीमेल ओपन होण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. देशभरात बहुसंख्य युजर्सना ही समस्या येत आहे. लोकप्रिय गुगलसह त्यासंबंधी सर्व वेबसाईट आणि सेवा बंद आहेत. यूट्यूब, जीमेल, गुगल ड्राईव्ह, गुगल शीटसह अनेक सेवा ठप्प आहेत. तांत्रिक कारणांमुळे या अडचणी येत असून, या सेवा नेमक्या कधी सुरु होणार याबाबत काहीही माहिती उपलब्ध नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज