मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस सुमित मोरगे या दानशूर भाविकाने ६ लाख रुपये किंमतीचे सोने-चांदी दागिने अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
दरम्यान, पौष शुद्ध पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरीत शुक्रवारी हजारो भाविकांची मांदियाळी जमली होती. दागिन्यांमध्ये गोफासह लिंग, बेलपान, मंगळसूत्र, बाजूबंद आदी ८१ ग्रॅम वजनाचे सोने वस्तू तसेच ७५ ग्रॅम वजनाचे चांदीचे करंडे, वेढणे जोड वस्तू दान केले आहेत.
सुमित मोरगे हे भाविक नांदेड येथील रहिवाशी आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे ते निस्सीम भक्त आहेत. त्यांनी यापूर्वी मंदिर समितीस श्री विठ्ठल गाभारा व श्री रुक्मिणी गाभारा येथील मेघडंबरीला चांदी लावून दिलेली आहे. शुक्रवारी पंढरीत एकादशीची गर्दी होती.
विट्ठल दर्शनासाठी किमान सहा ते सात तासांचा कालावधी
पौष शुद्ध पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासून विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी प्रदक्षिणामार्ग, महाद्वार, पश्चिमद्वारसह दर्शन रांग ही भाविकांच्या गर्दीन गजबजून गेली आहे.
काल विठ्ठल दर्शनासाठी किमान सहा ते सात तासांचा कालावधी लागतो आहे. तर मुखदर्शनासाठी एक ते दीड तासांचा कालावधी लागत आहे.
जालना येथील भाविकांकडून ७१ हजार रुपयांची देणगी
विठ्ठल रुक्मिणी मंदिरास जालना येथील रहिवाशी आर्या आदित्य अग्रवाल या भाविकांनी ७९ हजार रुपयांची देणगी दिल्याचीही माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली, त्याबद्दल संबंधित भाविकाचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्री ची प्रतिमा व उपरणे घेऊन सन्मान केला.
मोरगे यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आले असता, त्यावेळी त्यांनी मंदिर समितीच्या कार्यालयास संपर्क करून सदरची देणगी दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज