mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सहनशीलता संपली! येत्या दहा दिवसांत मराठा समाजास आरक्षण द्या, ओबीसीत समावेश करा, अन्यथा सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील; मनोज जरांगे पाटलांचा अल्टीमेटम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 14, 2023
in राज्य
दमदार योद्धा! अध्यादेश आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही, आजपासून ‘हे’ सुटलं म्हणून समजा; मनोज जरांगे यांचा सरकारला थेट इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स। 

अंतरवली सराटी येथे भगव वादळ आलं आहे. हजारो मराठा बांधव अंतरवली सराटीत एकत्र जमले आहे. आरक्षणासाठी मराठा समाज एकवटला आहे. सरकारने आरक्षणासाठी दिलेली मुदत आज संपत आहे.

तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी दहा दिवस आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी दिले आहेत. त्यापूर्वीच आज मनोज जरांगे पाटील यांनी सभा घेऊन सरकारला सज्जड इशारा दिला आहे.

तुम्ही आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 40 व्या दिवशी काय करणार हे सांगू, असा सूचक इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. यावेळी त्यांनी भरसभेत सरकारकडे सहा महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी भर सभेतून सरकार समोर डरकाळी फोडली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

आम्हाला महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी चालेल. पण एनटी व्हिजेएनटीचा प्रवर्ग टिकला तरच आरक्षण घेणार. नाही तर 50 टक्क्याच्यावर घेणार नाही, असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं.

समितीचं कामकाज बंद करा

मराठा आरक्षणासाठीची स्थापन करण्यात आलेल्या समितीचं काम बंद करा. चार दिवसात कायदा पारित होणार नाही. एक महिन्याचा काळ द्या असं तुमचं आमचं ठरलं होतं. आता 5 हजार पानांचा पुरावा मिळाला आहे. त्याचा आधार घेऊन कुणबी समाजात समावेश करून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा, अशी मागणीही त्यांनी केली.

केंद्र आणि राज्य सरकारने मराठ्यांचे हाल करू नये. तुम्ही आमचा ओबीसीत समावेश करा. दहा दिवसापेक्षा अधिक काळ वाट पाहण्याची आमची तयारी नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

मुस्काटात मारली

मराठा समाज एकत्र येत नाही असं म्हणणाऱ्यांच्या मुस्कटात या गर्दीने जोरदार मारलीय. तुम्ही इथे कशाला आला हे सांगा त्यांना. आरक्षणासाठी की आरडाओरडा करण्यासाठी आलाय का हे सांगा, असंही ते म्हणाले.

40 व्या दिवशी सांगू

मुलाच्या हितासाठी आणि नातवाच्या हितासाठी मी या सभेचा साक्षीदार झाल्याची भावना तुमच्या मनात निर्माण झाली असेल. घराघरातून मराठा पेटून उठलाय. मराठा समाजाच्या वतीने विनंती आहे, तुमच्या हातात आता दहा दिवस आहे.

आज लाखोंचा जनसमुदाय अंतरवलीत उसळलाय. त्याचं एकच म्हणणं आहे. राहिलेल्या दहा दिवसात आरक्षण जाहीर करा. आरक्षण नाही दिल तर 40व्या दिवशी सांगू, असा इशाराच त्यांनी दिला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मनोज जरांगे पाटील

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 26, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतीत जाऊनही ग्रामसेवक भेटत नाही? राज्य सरकारने गुपचूप घेतला ‘हा’ मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

August 24, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

मदतीचा हात! मंगळवेढ्यातील तरुणाला किडनी प्रत्यारोपणासाठी मदतीची गरज; गरजूंनी मदत करण्याचे आवाहन; उद्या ऑपरेशन

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मत मागायला दारी, तर समस्या सोडवायलाही जनतेच्या दारीच! आमदार आवताडे गावपातळीवर करणार थेट मुक्काम; गावकऱ्यांच्या समस्यांचे जागेवरच होणार निरसन

September 2, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा