टीम मंगळवेढा टाईम्स ।
मागील भांडणाच्या कारणावरून मंगळवेढा शहरातील भर चौकात गजेंद्र महादेव शिवपुजे या तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला.
दरम्यान, जखमीने जीव वाचविण्याच्या आकांताने आय.सी.आय.सी.आय बँकेत घुसल्याने तो बालंबाल बचावला.
या प्रकरणी रामेश्वर महादेव कोळी (रा उचेठाण) याला पोलिसांनी तात्काळ गजाआड केले.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी तथा जखमी गजेंद्र शिवपुजे व त्याचे वडील महादेव शिवपुजे हे दोघे मोटर सायकलवर बसून दि. १२ रोजी सकाळी १०.०० वा . आय . सी . आय . सी . बँकेजवळ असलेल्या टेलरच्या दुकानाजवळ आले होते.
जखमीचे वडील टेलर दुकानात देवासाठी कपडे घ्यायला आत गेले. तर जखमी हा मोटर सायकलवर बसला असताना अचानक पाठीमागून येवून आरोपीने डोक्यावर कोयत्याने हल्ला केला.
यावेळी जखमी गजेंद्र हा मोटर सायकलवरून खाली कोसळला. या दरम्यान आरोपीने तुझा गेम करतो असे म्हणून दुसरा हल्ला करीत असताना वडीलांनी पाहून ते पळत आले.
हल्ला करीत असताना जखमी हा आय.सी.आय.सी.बँकेत घुसला त्यापाठोपाठ आरोपीही हल्ला करण्यासाठी त्याचे पाठीमागे बँकेत गेला. हे हल्ल्याचे थरार नाटय सुरु असताना बँकेतील अधिकारी व कर्मचारी धावून आले.
उपस्थित वॉचमनने आय .सी . आय . सी . आय बँकेचे ग्रील बंद केले तसेच जखमीने आरोपीला पाठीमागून जोराने पकडल्याने तो पळून जावू शकला नाही.
तात्काळ डी.वाय.एस.पी. राजश्री पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक बापू पिंगळे, हवालदार सुनिल गायकवाड, महेश कोळी , तुकाराम कोळी , दत्तात्रय येलपले आदीनी आरोपी ताब्यात घेवून जेरबंद केले.
दरम्यान , भर चौकात भर दिवसा हा खुनी हल्ला झाल्याने काही क्षण नागरिक भेदरलेल्या अवस्थेत दिसून येत होते. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज