mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! फरार लाचखोर तलाठी सुरज नळे अखेर अटकेत, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ठोकल्या बेड्या; लाचेत कोण कोण हिस्सेदार आज होणार उलगडा?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 1, 2023
in मंगळवेढा, सोलापूर
लाचखोर तलाठी सुरज नळे आद्यप फरार, शोधासाठी पथके रवाना, चव्हाणाला चार दिवसाची पोलिस कोठडी; लाचेत कोण-कोण हिस्सेदार? मालमत्तेची चौकशी होणार?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सात हजाराची लाच स्विकारून फरार झालेला तलाठी आरोपी सुरज रंगनाथ नळे याला अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यानी अटक केली आहे.

लाचखोर तलाठी सुरज नळे याला आता अटक झाली असून या लाचेत कोण कोण हिस्सेदार आहेत याचा उलगडा होणार आहे.

लाचेची रक्कम घेवून सुरज नळे हा फरार झालेला होता मोठ्या शिताफीने अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यानी त्याला अटक करून बेड्या ठोकल्या आहेत.

सोलापूर- सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मधून गेलेल्या पाईपलाईनची मंजूर रक्कम 1 लाख 43 हजार 794 रुपये देण्यासाठी 7 हजाराची लाच स्विकारून तलाठी आरोपी सुरज रंगनाथ नळे लाचेची रक्कम घेवून तो फरार झाला होता.

तर झिरो कर्मचारी तथा आरोपी पंकज महादेव चव्हाण (वय 22 रा.शेलेवाडी) याला पोलिसांनी केले जेरबंद आहे. दरम्यान झिरो कर्मचार्‍यास न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने दिली चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील 51 वर्षीय फिर्यादी शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या मालकीची कमलापूर ता.सांगोला येथील गट नं.52 मधून सोलापूर-सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 गेला आहे.

सदर जमिनीमध्ये असलेली  पाईपलाईन बाधित झाली असून पाईपलाईनची शासकिय किंमत 1 लाख 43 हजार 794 रुपये इतकी मंजूर झाली होती. तक्रारदार यांच्या मित्राच्यावतीने पाठपुरावा करीत असताना यातील आरोपी खाजगी इसम चव्हाण याने तलाठी तथा आरोपी नळे यांच्या वतीने लाचेची मागणी केली होती.

तडजोडीअंती 7 हजार रुपये लाचेची मागणी करून सापळा कारवाईदरम्यान रक्कम आरोपी नळे स्विकारून त्याच्या स्विफ्ट डिझायर (क्र.एम.एच.13 सीएएस 5328) मधून दि.29 रोजी रात्री 10.15 वा.मेटकरी दवाखान्याजवळून फिल्मी स्टाईलने पळून गेले.

तदनंतर पोलिस पथकाने नळे यांच्या तुकाईनगरमधील घराजवळ सापळा आयोजित केला असता सदर ठिकाणी नळे हे त्यांच्या चार चाकी वाहनातून आले होते.

या दरम्यान अँटी करप्शनचे अधिकारी व अंमलदार यांनी थांबविण्याचा इशारा करूनही ते न थांबता त्यांच्या ताब्यातील चार चाकी गाडी अतीवेगाने कोणाच्याही जीवाची पर्वा न करता वेगाने वाहन चालवून रकमेसह पळून गेले.

यावेळी पोलिस अंमलदार सन्नके यांना घासून गाडी आरोपीने नेल्यामुळे त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून दवाखान्यात उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधिक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक गणेश कुंभार, पोलिस निरिक्षक उमाकांत महाडिक, पोलिस अंमलदार मुल्ला, घाडगे, सन्नके, उडानशीव आदीनी केली.

दरम्यान, मंगळवेढा प्रांत कार्यालय हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून सोलापूर-सांगली हा राष्ट्रीय महामार्ग गेल्यापासून येथे बाधित शेतकर्‍यांना टक्केवारीवर पैसे घेतल्याशिवाय बाधितांच्या रकमा न देता त्यांची अडवणूक करीत असल्याच्या या पुर्वीही अनेक तक्रारी बाधित  शेतकर्‍यांच्या होत्या.

याबाबत वेळोवेळी रास्ता रोकोसारखे येथील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या विरोधात आंदोलनही करण्यात आली. मात्र जिल्हा प्रशासनातील  अतिवरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे गांभिर्यपूर्वक न पाहता येथील अधिकार्‍यांची पाठराखण केल्यानेच आजचा प्रकार घडल्याची खमंग चर्चा दिवसभर सुरु होती.

महामार्गातील बाधित शेतकर्‍यांच्या रकमा देण्यापोटी येथील अधिकारी व कर्मचार्‍यांनी लाखो रुपयांची वरकमाई केल्याची चर्चा या निमित्ताने रंगली असून या अधिकार्‍यांच्या मालमत्तेची चौकशी होण्याची मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे.

जबाबदार अधिकार्‍यांच्या मालमत्तेची चौकशी

आरोपी तलाठी सुरज नळे यापुर्वी ग्रामीण भागात सजेत कार्यरत असताना अधिकार्‍यांनी येथे खास त्याला टक्केवारी वसुलीसाठी ठेवण्यात आल्याचा बोलबाला सुरु असून शासनाची पगार घेवून जनतेची कामे करणे अपेक्षित असताना

संगणकाच्या कामाच्या नावाखाली टक्केवारी वसुल करणे कुठल्या कायदयाच्या चौकटीत हे काम बसत आहे. असा सवाल या घटनेनंतर जनतेमधून विचारला जातो आहे.

पुणे विभागाचे महसूल आयुक्त यांनी याकामी लक्ष घालून येथील जबाबदार अधिकार्‍यांच्या मालमत्तेची चौकशी लावून दुधाचे दुध व पाण्याचे पाणी करून सर्वसामान्य जनतेच्या मनातील शंका दूर करावी व गैरमार्गाने संपत्ती कमविणार्‍यावर कारवाई व्हावी अशी आग्रहाने मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.

दरम्यान, लाचखोर तलाठी सुरज नळे याला आज न्यायालयात उभे केले जाणार असून त्यानंतर अनेक गोष्टींचा उलघडा होणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अटकसुरज नळे

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात सुन्न करणारी घटना! ११ वर्षांच्या चिमुरडीने शेतात जाऊन संपवलं जीवन; कारण…

July 18, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

महाराष्ट्रावर आस्मानी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

July 18, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

दसरा-दिवाळी दरम्यान ग्रामपंचायतींसाठी निवडणूक! सरपंच निवड थेट जनतेतून; ४ ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या; निवडणुकीसाठी वापरली जाणार ‘या’ तारखेची मतदार यादी

July 18, 2026
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

डोळ्यांदेखत स्वप्ने जळतायत! पाऊस नसल्याने उभी पिके करपली; मंगळवेढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई; ‘सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा’, शेतकऱ्यांची आर्त हाक

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
Next Post
एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवेढ्यातील तत्कालीन मंडळअधिकारी रंगेहाथ सापडला

तलाठी सुरज नळे याला चार दिवसाची पोलीस कोठडी; चाैकशीत बडा मासा गळाला लागण्याची शक्यता; शेतकर्‍यांना न्याय मिळणार?

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात सुन्न करणारी घटना! ११ वर्षांच्या चिमुरडीने शेतात जाऊन संपवलं जीवन; कारण…

July 18, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

महाराष्ट्रावर आस्मानी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

July 18, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

दसरा-दिवाळी दरम्यान ग्रामपंचायतींसाठी निवडणूक! सरपंच निवड थेट जनतेतून; ४ ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या; निवडणुकीसाठी वापरली जाणार ‘या’ तारखेची मतदार यादी

July 18, 2026
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..