टीम मंगळवेढा टाईम्स ।
जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज दि.18 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज कारखाना स्थळी मोफत आरोग्य तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण कार्यक्रम, मोफत नेत्र तपासणी, मोफत कानाची तपासणी त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सायकली वाटप असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
या समाजोपयोगी कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य शेतकी अधिकारी नानासाहेब बाबर यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज