टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील दैनिक स्वाभिमानी छावाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आज मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर व गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित केले असल्याची माहिती संपादक ज्ञानेश्वर भगरे यांनी दिली.
आज सकाळी 10 वाजता जिल्हा शिक्षक सोसायटी सभागृह, शिशुविहार जवळ श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली यांचे नेत्ररोग शिबिर आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प सुधाकर महाराज इंगळे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प भागवत महाराज चवरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
मंगळवेढा व परिसरातील नागरिकांची तज्ञ डॉक्टर मार्फत नेत्र तपासणी होणार असून मोतीबिंदूसाठी नेत्र भिंगारोपण व अत्याधुनिक फेको मशीनद्वारे उत्तम नेत्रशस्त्रक्रिया होणार आहे.
त्याचबरोबर काचबिंदू , लासरू, तिरळेपणा व डोळ्याची प्लास्टिक सर्जरी इत्यादीवर अल्प खर्चात शस्त्रक्रिया करणार करण्यात येणार आहे.
या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन कार्यकारी संपादक महेश वठारे, उपसंपादक लहू ढगे, विजय भगरे यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज