टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीला येणाऱ्या भाविकांसाठी उजनी धरणातून चार हजार क्युसेकने भीमेत पाणी सोडण्यात आले आहे.
शनिवार १८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता उजनीतून भीमा नदीत दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला.
त्यात रविवारी वाढ करून धरणाच्या दरवाजातून २४०० क्युसेक व विद्युत प्रकल्पाद्वारे १६०० क्युसेक असे एकूण ४००० क्युसेकने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे.
हा प्रवाह २२ नोव्हेंबर पर्यंत चालू राहणार आहे. त्यासाठी धरणातील अंदाजे दीड टीएमसी पाण्याचा वापर होणार असल्याचे उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत माने यांनी सांगितले.
या पाण्याचा उपयोग २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला येणाऱ्या भाविकांबरोबरच भीमा नदी काठावरील गावांसाठी पाणीपुरवठा योजनांसाठीही होणार आहे.
मागील वर्षी याच तारखेला धरणातील एकूण जलसाठा १२३.२८ टीएमसी तर उपयुक्त जलसाठा ५९.६२ टीएमसी एवढा होता, टक्केवारी १११.२८ होती. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी ३६.८९ टीएमसी साठा कमी आहे.
धरणाची सद्यस्थिती
। एकूण पाणीपातळी : ४९३.८८० मीटर
■ एकूण जलसाठा : ८६.३९ टीएमसी
■ उपयुक्त जलसाठा : २२.७३ टीएमसी
टक्केवारी : ४२.४३
आऊट फ्लो
सीना माढा उपसा : ३३३ क्युसेक
■ दहीगाव उपसा : १२० क्युसेक
बोगदा : ९०० क्युसेक
■ मुख्य कालवा : २४०० क्युसेक
■ विद्युत प्रकल्प : १६०० क्युसेक
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज