मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा येथे नायब तहसिलदार असल्याची बतावणी करत कमी दरात शासकीय जागा मिळवून देतो असे सांगून अनिवासी भारतीय नागरिकाची चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत श्रीशैलकुमार बसवण्णाप्पा हादीमणी ( वय ५५, रा. जॉर्जिया, अमेरीका, मुळ. जेऊरगी रोड, कलबुर्गी, कर्नाटक) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीवरून मुख्य आरोपी मनोज अश्रुबा गोडबोले ( वय ५५ ) याच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी हादीमणी यांची २०१८ मध्ये आरोपी मनोज गोडबोले यांच्याशी झाली. त्यावेळी आरोपी गोडबोले याने आपण नायब तहसिलदार असून मंगळवेढा येथे कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय जमिनी कमी दरात कायदेशीर तुम्हाला मिळवून देतो असे त्यांने सांगितले. त्यानंतर त्याने विजापूर रोड जवळील २ हेक्टर जागा दाखवत ही जागा शासकीय असल्याचे सांगितले.
त्यानंतर त्याने पुणे मधील हडपसर येथील जागा असल्याचे सांगत तेथील जागा मिळवून देण्याचे सांगत फिर्यादीकडून वेळोवेळी चार कोटी शंभर रूपये घेत त्यांची फसवणूक केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज