टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील चार मंडळे डाळिंब विमा भरपाई पासून रिलायन्स कंपनीने वगळल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी विमा कंपनीचे मंगळवेढा तालुक्यातील प्रतिनिधी यांना याबाबत भेटून निवेदन दिले आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे, प्रभूचंदन शिंदे, बापूसाहेब कलुबर्मे, चंद्रशेखर राजमाने, अर्जुन मुदगुल, कैलास चळेकर, रवी गोवे व शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी घुले म्हणाले, मंगळवेढा तालुक्यातील मंगळवेढा, भोसे, मारापूर , आंधळगाव ही महसूल मंडळे विमाभरपाई पासून रिलायन्स विमा कंपनीने वगळलेले आहेत.
प्रत्यक्षामध्ये मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी डाळिंबीचा विमा हप्ता भरताना सोने नाणे गहाण टाकून शेळ्यामेंढ्या विकून हेक्टरी ६५०० रुपयाचा विमा हप्ता भरलेला आहे. प्रत्यक्षामध्ये विमा कंपनीची व शासनाचे जे निकष ठरविलेले आहेत.
त्या निकषाप्रमाणे संपूर्ण मंगळवेढा तालुका डाळिंबाचा विमा मिळण्यास पात्र आहे, तशी माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे.
तहसीलची मंडलनिहाय पर्जन्यमापक यंत्रणेची माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. १६ जून ते १६ जुलै या कालावधीमध्ये सलग २२ दिवसाचा पावसाचा खंड आहे.
विमा कंपनीच्या नियमाप्रमाणे सलग २१ दिवस पावसाचा खंड असल्यानंतर १ ला हप्ता मंजूर होतो, तरीदेखील विमा कंपनीने मंगळवेढा तालुक्यातील जे ४ मंडळे वगळली आहेत.
त्या मंडळामधून लाखो रुपयाचा विमा कंपनीने गोळा करून शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा टाकलेला आहे. प्रत्यक्षामध्ये डाळिंबाच्या बागा पूर्णपणे उद्धवस्त झालेले आहेत तरी विमा कंपनीने जर १० दिवसांमध्ये या ४ मंडळांना विमा नाही मंजूर केला तर विमा कंपनीचे कार्यालय फोडून टाकू.
यापुढे रिलायन्स कंपनीच्या प्रतिनिधींना मंगळवेढा तालुक्यातून १ रुपयाचा सुद्धा विमा गोळा करू दिला जाणार नाही याची जबाबदारीने नोंद घ्यावी असा इशारा दिला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज