टीम मंगळवेढा टाईम्स ।
जत शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख, एसआरव्हीएम हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक शिवाजीराव ताड (सर) ( वय-७५) यांचे पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.
जतच्या राजकीय पटलावर आक्रमक नेतृत्व म्हणून शिवाजीराव ताड यांना ओळखले जायचे. जतला शिवसेना वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
शिवसेनेचे तालुकाध्यक्ष म्हणून काम त्यांनी काम केले.त्यांच्या निधनाने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.
जतचे माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान नगरसेवक विजय ताड यांचे ते वडील असून त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले , तीन मुली ,जावई, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.
उद्या सकाळी 9 वाजता जत येथे अंत्यसंस्कार
कै.शिवाजीराव ताड यांच्यावर शुक्रवारी सकाळी दहा वाजता ताड मळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
■■■■
शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले. शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकांना मोठे केले.
सुरेश भाऊ खाडे यांना आमदार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असून .व कै आमदार मधुकर कांबळे यांना आमदार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याचबरोबर जतचे माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे यांना राजकीय कारकिर्दीत मोठे करण्यात सिंहाचा वाटा होता.
तसेच एस आर व्हिएम हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून ते कार्यरत होते .अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांनी घडवले. एस आर व्हिएम हायस्कूल ला नावलौकिक मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता ते एस आर व्हिएम हायस्कूल चे मुख्याध्यापक म्हणून सेवा निवृत्त झाले होते.
त्यांच्या निधनाने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नगरसेवक विजय ताड यांचे ते वडील असून त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली ,जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी दहा वाजता ताड मळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज