टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोणत्याही पदावर नसताना येथील माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार यांनी आपल्या नावापुढे नगरपरिषदेचे बोधचिन्ह वापरून लेटरपॅडचा गैरवापर करीत प्रशासनाची दिशाभूल केल्याचा
ठपका मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी ठेवला आहे. याप्रकरणी तीन दिवसांत खुलासा करावा, अशा आशयाची नोटीस पवार यांना बजावण्यात आली आहे.
याबाबत मुख्याधिकारी डॉ.गवळी यांनी दिलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार यांनी नगरपरिषद व वरिष्ठ कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार करण्यासाठी नगरपरिषदेच्या कोणत्याही पदावर नसताना स्वतःच्या नावापुढे नगराध्यक्ष व नगरपरिषदेचे बोधचिन्ह असलेल्या लेटर पॅडचा वापर केला आहे.
तसेच विविध तारखांना पत्रव्यवहार केला आहे. वास्तविक पाहता पदावर नसताना अशा प्रकारच्या लेटरपॅडचा पत्र व्यवहारांमध्ये वापर करता येत नाही.
परंतु नवनाथ पवार यांनी नावापुढे नगराध्यक्ष असा उल्लेख असलेले लेटर व बोधचिन्हाचा वापर करून प्रशासनाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे याबाबत माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार यांना तीन दिवसाच्या आत खुलासा करावा, अशा प्रकारची नोटीस बजावली आहे.
या नोटीसीची प्रत माहितीसाठी पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहे.
नोटीसीला मी रितसर उत्तर देणार
मी माझ्या लेटर पॅडचा कसलाही गैरवापर केला नाही. ” जनतेच्या हिताच्या कामासाठीच वापर केला आहे. नगराध्यक्ष असतानाचे लेटर पॅड होते. शक्यतो प्रत्येक लेटरवर ‘माजी’ असे हाताने लिहीत असतो.
एखाद्या लेटरवरती नजरचुकीने राहिले असल्याची शक्यता आहे. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या नोटीसीला मी रितसर उत्तर देणार आहे.- नवनाथ पवार, माजी नगराध्यक्ष, सांगोला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज